IPS Officers Deven Bharti and Ashutosh Dumbare Promoted Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात मोठी पदोन्नती, २ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना महासंचालकपदी बढती

IPS Officers Deven Bharti and Ashutosh Dumbare Promoted : मुंबई- ठाण्यातील आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. आशुतोष डुंबरे आणि देवेन भारती यांना पोलिस महासंचालक श्रेणीमध्ये पदोन्नती देण्यात आली आहे.

Priya More

महाराष्ट्र पोलिस दलातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील २ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. आशुतोष डुंबरे आणि देवेन भारती यांना पोलिस महासंचालक श्रेणीमध्ये पदोन्नती देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश २० नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन आदेश प्रसिद्ध केला आहे. २ वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांची मूळ जागीच पदोन्नती केली गेली. मुंबई शहर पोलिस दलाचे आयुक्त आणि ठाणे शहर पोलिस दलाचे आयुक्त आहे त्याच ठिकाणी राहणार आहेत. देवेन भारती मुंबई पोलिस आयुक्त म्हणूनच कायम असणार आहेत. तर आशुतोष डुंबरे ठाणे शहर पोलिस आयुक्त म्हणून कायम राहणार आहेत. या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांची मूळ जागीच पदोन्नती करण्यात आली आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांच्या विद्यमान पदस्थापनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यांना त्याच पदावर 'इन-सिटू प्रमोशन' देण्यात आले आहे. आशुतोष डुंबरे यांची ठाणे पोलीस आयुक्तपदीच पदोन्नती मिळाली आहे. आशुतोष डुंबरे हे सध्या ठाणे शहराचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पोलिस महासंचालक श्रेणीमध्ये पदोन्नती देण्यात आली असून त्यांची ठाणे शहर पोलिस आयुक्तपदीच पदस्थापना कायम ठेवण्यात आली आहे.

तर दुसरीकडे देवेन भारती हे मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनाही पोलिस महासंचालक श्रेणीमध्ये पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांचीही बृहन्मुंबई पोलिस आयुक्तपदीच पदस्थापना कायम ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने हा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Temple Visit : देव दर्शनाला जाताय? मंदिरात 'या' ५ गोष्टी करणे टाळा; करिअरमध्ये होईल प्रगती, घरात वाढेल पैसापाणी

महिलांनी सकाळी उठल्यानंतर चुकूनही ही 5 कामे करू नये

Solapur : 'सैराट'ची प्रसिद्ध विहीर पडली कोरडी; 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव

Sinus : हिवाळ्यात सायनसचा त्रास का वाढतो? नाक बंद होणे, डोकेदुखी टाळण्यासाठी करा 'हे' ५ घरगुती उपाय; मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update: चोंढी प्रकल्पातून ९७५ एकर शेतीसाठी पाणी सोडले

SCROLL FOR NEXT