Maharashtra Corona Update  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Corona: महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक; आजच्या आकडेवारीमुळे नागरिकांच्या चितेंत भर

आज दिवसभरात ६१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या ७७,३८,५६४ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात मागील आठवड्यापासून कोरोना (Corona) रुग्णांत लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी, ५ जून रोजी महाराष्ट्रात १४९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६७६७ वर पोहोचली आहे. याशिवाय, दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १,४७,८६६ झाली. दिवसभरात ६१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या ७७,३८,५६४ झाली आहे. राज्यातील बरे होण्याच दर ९८.०४% एवढा आहे. तर मृत्यू दर १.८७% एवढे आहे.

राज्यातील रुग्णांची आकडेवारी

मुंबई विभागात- ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल या शहरांचा समावेश आहे. या विभागात १३६२ नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.

नाशिक विभागात - यामध्ये नाशिक, नाशिक एमसी, मालेगाव एमसी, अहमदनगर, अहमदनगर एमसी, धुळे, धुळे एमसी, जळगाव, जळगाव एमसी, नंदुरबार यांचा समावेश आहे, या विभागात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे विभागात- यात पुणे, पीएमसी, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर एमसी, सातारा यांचा समावेश आहे. या विभागात ९९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर विभागात- कोल्हापूर, कोल्हापूर एमसी, सांगली, सांगली एमसी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात आज २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.(Corona Latest News)

औरंगाबाद विभागात- औरंगाबाद, औरंगाबाद एमसी, जालना, हिंगोली, परभणी, परभणी एमसी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

लातूर विभागात- लातूर, लातूर एमसी, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड एमसी, या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात नव्या १ रुग्णाची नोंद झाली आहे.

अकोला विभागात- अकोला, अकोला एमसी, अमरावती, अमरावती एमसी, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे, या विभागात ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर विभागात- नागपूर, नागपूर एमसी, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, चंद्रपूर एमसी, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात ५ नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT