मुंबई/पुणे

Maharashtra Politics: "महाराष्ट्राला नानाभाऊच मुख्यमंत्री हवेत! लवकरच नानापर्व!"पुण्यात झळकले पटोले यांचे फ्लेक्स

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

मुख्यमंत्री कोण होणार यावरून मविआत वाद सुरू असतानाच पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेत. यामुळे मविआचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार याचं उत्तर मिळालंय का? महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. तर दुसरी ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री कोण असेल हे जाहीर करावं, अशी मागणी केली जात आहे.

त्याचदरम्यान नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्याने मविआत वाद होण्याची शक्यता आहे. का नानाच मविआचे मुख्यमंत्री होणार, हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

एक दिवसापूर्वीच मी मुख्यमंत्री होणार, असे विधान स्वत:नाना पटोले यांनी केले होते. त्यात आता पुण्यात नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स झळकले आहेत. शहरात लावत आलेल्या बॅनर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. "महाराष्ट्राला नाना भाऊ च मुख्यमंत्री हवे" असा मजकूर या फ्लेक्स वर लिहिण्यात आलाय. पुण्यात अनेक ठिकाणी नाना पटोले यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आलीय.

उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाबाबत काय बोलणार याची चर्चा सुरू असतानाच हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

भंडाऱ्यात पत्रकारांशी बोलतांना नाना पटोले यांनी आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला होता. नक्कीच मी मुख्यमंत्री होणार असं नाना पटोले यांनी वक्तव्य केलं होतं.

काय होता दावा

मीच बनणार मुख्यमंत्री, भंडारा जिल्ह्यात काल प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांचं नाव न घेता भावी हे भावीच, राहतील असं वक्तव्य केलं होत. त्यावर नाना पटोले यांनी उत्तर देताना सांगितलं की मला आमदार होऊ देत नव्हते आमदार झालो खासदार होऊ देत नव्हते खासदार झालो, विधानसभा अध्यक्ष सुध्दा झालो. आता मुख्यमंत्री होणारच असं वक्तव्य नाना पटोले यांनी भंडारा येथे केलं. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचं चित्र सद्या पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Fare: ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांच्या खिशाला कात्री, ST चा प्रवास महागणार

Maharashtra News Live Updates :पुण्यात शहरातील अनेक भागात पावसाची हजेरी

Job Recruitment: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये Non-Executiveपदांसाठी भरती; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज

Maharashtra Politics : दसरा मेळाव्याआधीच मुंबईत राजकीय वातावरण तापलं; बॅनर फाडल्याने ठाकरे गट आक्रमक

Thackeray Vs Shinde : दसरा मेळाव्याआधीच शिंदे - ठाकरे गट आमनेसामने! कल्याणमध्ये घडला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT