Raj Thackeray-Uddhav Thackeray Saam Tv News
मुंबई/पुणे

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

Raj Thackeray-Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याआधी नेमकं काय घडलं? ठाकरे बंधूंनी मेळाव्यातून मराठी बांधवांना नेमकं काय आवाहन केलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Prashant Patil

मुंबई : ही गर्दी आहे मराठी भाषेवरच्या अन्यायविरोधातली वरळीला ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची २० वर्षांनंतर एकत्र येण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी मराठी माणसांनी तोबा गर्दी केली. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही मराठी माणसाची ही गर्दी मराठीला विरोध करणाऱ्या आणि मागल्या दारानं हिंदीसक्ती लादणाऱ्यांची धडकी भरवणारी होती.

मातोश्रीहून उद्धव ठाकरे आणि शिवतीर्थावरून राज ठाकरेंही डोमच्या दिशेनं रवाना झाले. डोमबाहेर मराठीसाठी एकजूट झालेल्या मराठी बांधवांनी राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही भावांची बंद दाराआड चर्चाही झाली, आणि हजारोंच्या उपस्थितीत स्टेजवर झाली ठाकरे बंधूंची ग्रँड एन्ट्री झाली.

जमलेल्या सर्व मराठी बांधवांना राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंच्या उपस्थित एकीचा नारा देत मराठीद्रष्ट्यांना झोडपून काढलं. तर उध्दव ठाकरे यांनी आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. असं सांगत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यांच सुतोवाच केलं. २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्यानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड स्थापित झालाय. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा ठाकरे ब्रँड सत्तेची समीकरण बदलणार का ? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

Maharashtra Live News Update: वसई विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी पी यांची नियुक्ती

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

राज्याच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

SCROLL FOR NEXT