ACB officials arrest a ministry officer caught red-handed while accepting a bribe in Kharghar. saam tv
मुंबई/पुणे

Mantralaya Bribe Case: निधी मंजुरीसाठी ६ लाखांची लाच; मंत्रालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

Birbe Case: लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने सापळा रचत खारघरमध्ये एका अदिकाऱ्याला अटक केली आहे. या कारवाईतून भ्रष्टाचाराविरोधात वाढती दक्षता दिसून येते.

Bharat Jadhav

  • मंत्रालयातील अधिकारी लाच घेताना रंगेहाथ अटक

  • ६.३७ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप

  • एसीबीने खारघरमध्ये सापळा रचून कारवाई

विकास मिरगणे, साम प्रतिनिधी

मंत्रालयातील आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्यासला आणि मंत्र्याच्या स्वीय सहायकाला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. आता पुन्हा मंत्रालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधन विभागाने अटक केली आहे.

खारघर परिसरातही कारवाई करण्यात आली आहे. लाच घेताना सापळा रचून एसीबीकडून लाचखोर अधिकाऱ्यास बेड्या ठोकण्यात आल्या. विलास लाड असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून काम करत होता. निधी मंजूर करून देण्यासाठी त्याने एकाकडे तब्बल 6 लाख 37 हजार रुपयांची लाच मागितली होती, हे लाच घेताना अटकेची कारवाई करण्यात आली.

ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करुन देण्यासाठी या अधिकाऱ्याने लाच मागितली होती, त्यानुसार 6 लाख 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने लाचखोर आरोपीला अटक केली. मंत्रालयातल्या लाचखोरीला चाप बसवण्यासाठी एसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात एसीबीने कारवाईचा धडाका लावला होता.

मार्च एन्डमुळे ही कारवाई होत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. मात्र आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एसीबीने पुन्हा एकदा आपला मोर्चा थेट मंत्रालयात वळवला आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारी असलेल्या विलास लाडला रंगेहाथ पकडत अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रशासन आणि सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार व सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

खाण व्यवसायासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली लाच

अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर जिल्ह्यातील काही खाण मालकांनी लाच मागितल्याचा आरोप केला आहे. जिल्ह्यातील गिट्टी आणि दगड खाणी सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप या खाण मालकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT