Uddhav Thackeray on Eknath Shinde and Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी; महायुतीचे अनेक उमेदवार पिछाडीवर, वाचा आकडेवारी

Maharashtra lok sabha Nivadnuk Nikal 2024 : राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडी तब्बल २८ जागांवर आघाडीवर आहेत.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचे प्राथामिक कल समोर आले आहेत. त्यानुसार, राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडी तब्बल २८ जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे महायुतीचे अनेक उमेदवार पिछाडीवर पडले असून त्यांच्याकडे केवळ १९ जागांचीच आघाडी आहे.

तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा दबदबा पाहायला मिळत आहेत. सध्या राज्यात भाजपचे सर्वाधिक १४ उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या १२ ते १३ उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसकडे ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे ६ जागांची आघडी आहे.

शिवसेना शिंदे गटाचे अनेक उमेदवार पिछाडीवर आहेत. त्यांच्याकडे ५ जागांची आघाडी आहे. महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही त्यामुळे कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर

  • मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे 1490 मतांनी आघाडीवर आहेत.

  • कोल्हापूरमधून शाहू महाराज दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहे.

  • बीड लोकसभेच्या मतमोजणीच्या तिसरी फेरीत पंकजा मुंडे पिछाडीवर आहे.

  • पुण्यामधून दुसऱ्या फेरीत मुरलीधर मोहोळ 12 हजार 629 मतांनी आघाडीवर आहेत.

  • शिरुरमधुन चौथ्या फेरीत अमोल कोल्हे 18674 मतांनी आघाडीवर आहेत.

  • सांगली लोकसभेत तिसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील 16 हजार 561 मतांनी आघाडीवर आहेत.

  • रत्नागिरीमध्ये नारायण राणे आघाडीवर आहेत. तर ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर आहे.

  • बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर असून सुनेत्रा पवार पिछाडीवर पडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Trains: पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! सलग ७ दिवस 'या' ३० गाड्या धावणार नाहीत; रेल्वेने सांगितलं मोठं कारण

पावसाळ्यात प्या गरमागरम पालक सूप; रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ठरेल फायदेशीर

Maharashtra News Live Update: नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

Covid-19 Death : भारतात पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री, ४६ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू

Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT