Hingoli News: मोठी बातमी! हिंगोलीमध्ये मतमोजणी केंद्रावर EVM मशीनमध्ये बिघाड

Hingoli EVM Machine Issue: हिंगोलीमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. पण अवघ्या काही मिनिटांमध्येच मतमोजणी केंद्रावरील EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
Hingoli News: मोठी बातमी!  हिंगोलीमध्ये मतमोजणी केंद्रावर EVM मशीनमध्ये बिघाड
Hingoli EVM Machine IssueSaam Tv

संदीप नागरे, हिंगोली

हिंगोलीमधून (Hingoli)मोठी बातमी समोर आली आहे. हिंगोलीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये (EVM Machin) बिघाड झाला आहे. सेनगाव तालुक्यात मतमोजणी केंद्रावरील बूथवर बिघाड झाला आहे. सेनगाव तालुक्यातील मतदान केंद्रावरील बूथवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे मतमोजणी केंद्रावर थोडे गोंधळाचे वातावरण होते. सहाय्यक निवडणूक अधिकारी उमाकांत पारधी यांनी मतदान पेटी ताब्यात घेतली आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. हिंगोलीमध्ये शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर विरुद्ध ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये तगडी फाइट झाली. हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे. आता या मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे अवघ्या काही तासांत समोर येईल.

Hingoli News: मोठी बातमी!  हिंगोलीमध्ये मतमोजणी केंद्रावर EVM मशीनमध्ये बिघाड
Loksabha Election Result: ब्रेकिंग! देशातील पहिला निकाल लागला; मतमोजणीआधीच भाजपने खातं खोललं

दुसरीकडे, बीडमध्ये मतमोजणी दरम्यान तांत्रिक अडचणी आल्यामुळे मतमोजणी थांबली आहे. बीडमधील ६ मतदारसंघात पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे १३५९ मतांनी आघाडीवर आहेत. तर पंकजा मुंडे या पिछाडीवर आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे टेन्शन वाढले आहे.

Hingoli News: मोठी बातमी!  हिंगोलीमध्ये मतमोजणी केंद्रावर EVM मशीनमध्ये बिघाड
Loksabha Election Result: पहिल्या कलांमध्ये पवार- ठाकरे जोरात! सांगलीत विशाल पाटलांची जोरदार मुसंडी; सातारा, माढ्यात काय स्थिती?

दुसरीकडे नाशिकमध्ये देखील मतमोजणी केंद्रावर तांत्रिक अडचणी येत आहेत. सिन्नरच्या बूथ क्रमांक ७ वरील मत मोजणी थांबवण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून मतमोजणी अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. EVM ची बॅटरी कमीच होत नसल्याचा ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांचा आरोप आहे.

Hingoli News: मोठी बातमी!  हिंगोलीमध्ये मतमोजणी केंद्रावर EVM मशीनमध्ये बिघाड
Nashik News: विखे पाटलांची एन्ट्री, शुभांगी पाटीलही बंडखोरीच्या तयारीत; नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रंगणार चढाओढ!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com