Maharashtra Police News  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Police : राज्य पोलीस दलात मोठा खांदेपालट; बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहआयुक्त पदाच्या पोलीस अधिकाऱ्यांची बदल्या झाल्या आहेत.

सूरज सावंत

Maharashtra Police News : राज्यातील पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहआयुक्त पदाच्या पोलीस अधिकाऱ्यांची बदल्या झाल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने मंगळवारी काढले आहेत. राज्यातील पुणे, नाशिक, नवी मुंबईसहित अनेक शहरातील पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सदानंद दाते यांची राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहेत. तर विश्वास नांगरे पाटील व निकेत कौशिक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालक मुंबई पदी नियुक्ती झाली आहे. मिलिंद भारंबे यांची नवी मुंबई पोलिस (Police) आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विनयकुमार चौबे यांची पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.

अमिताभ गुप्ता यांची अप्पर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्यपदी नियुक्ती झाली आहे. नवीनचंद्र रेड्डी यांची अमरावती पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर मुंबई गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.

रितेश कुमार पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त असणार आहे. तर मधुकर पांडे यांच्याकडे मीराभाईंदर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी असणार आहे. सत्यनारायण चौधरी याच्यावर मुंबई सह पोलिस आयुक्त कायदा व सुव्यवस्थेची जबादारी राहणार आहे. निशित मिश्रा यांची मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवीण कुमार पडवळ यांची मुंबईच्या वाहतूक विभागाचे नवे सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . लखमी गौतम यांची मुंबई पोलिस सहआयुक्त गुन्हे पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अंकुश शिंदे हे नवे नाशिकचे पोलिस आयुक्त असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

SCROLL FOR NEXT