Shikanji Recipe : घरीच साखरेशिवाय बनवा गोड शिकंजी, उन्हाळ्यात एक घोट पिताच मन होईल तृप्त

Shreya Maskar

उन्हाळा

कडाक्याच्या उन्हात फिरून आल्यावर थंडगार एक ग्लास शिकंजी प्या. तुम्ही रिफ्रेश व्हाल. तुमचा सर्व ताण निघून जाईल.

Summer | yandex

शिकंजी

शिकंजी बनवण्यासाठी थंड पाणी किंवा सोडा, लिंबांचा रस, गूळ , काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, पुदिन्याची पाने, बर्फाचे तुकडे इत्यादी साहित्य लागते.

Shikanji | yandex

गूळ

शिकंजी बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात थंड पाणी ओता आणि त्यात गूळ घालून चांगले ढवळा. गूळ नीट विरघळेल याची काळजी घ्या.

Jaggery | yandex

लिंबाचा रस

आता त्यात लिंबाचा रस, काळे मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घाला. तसेच बर्फाचे तुकडे आणि पुदिन्याची काही पाने मिक्स करा.

Lemon Juice | yandex

चाट मसाला

तयार केलेली शिकंजी एका ग्लासात ओता. त्यावर थोडा चाट मसाला भुरभुरवा आणि प्या.

Chaat Masala | yandex

पोषक घटक

शिकंजीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीराला उष्माघातापासून वाचवतात. आपले शरीर कायम हायड्रेट ठेवतात.

Nutritional Benefit | yandex

काळे मीठ

शिकंजीमधील काळे मीठ आणि जिरे अपचन टाळण्यास मदत करते. तुम्ही जेवून झाल्यावर एक ग्लास शिकंजी नक्की प्या.

Black Salt | yandex

साखरेला पर्याय

तुम्ही साखरे ऐवजी गूळ वापरा. गूळ आणि लिंबू यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, ज्यामुळे शरीर ताजेतवाने राहते.

Sugar | yandex

NEXT : कोकणात बनवतात तशी फणसाची झणझणीत रस्सा भाजी, चाखाल अस्सल गावरान चव

Fansachi Rassa Bhaji Recipe | saam tv
येथे क्लिक करा...