

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्गात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. यावर आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने कणकवली प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे चुलीवर भाकरी भाजत सरकारचं लक्ष वेधण्यात आलं. या आंदोलनामध्ये "नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर "अशा आशाचे बॅनर लावून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
महावितरणच्या ‘विद्युत सहायक’ भरतीतील अन्यायाविरोधात दिव्यांग उमेदवारांनी दिव्यांग आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. पात्र ठरूनही कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरवल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आंदोलकांपैकी बाळू राठोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दिव्यांग हक्क कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत तातडीने नियुक्ती व दोषींवर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्गात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. यावर आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने कणकवली प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे चुलीवर भाकरी भाजत सरकारचं लक्ष वेधण्यात आलं. या आंदोलनामध्ये "नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर "अशा आशाचे बॅनर लावून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
भारतीय रेल्वेने सुरक्षितता वाढवण्यासाठी कवच प्रणाली व सिग्नलिंग आधुनिकीकरणासाठी १,३६४.४५ कोटींची मंजुरी दिली. दक्षिण रेल्वेतील २३२ इंजिनांवर कवच ४.० बसवण्यासाठी २०८.८१ कोटी खर्च होणार आहे. उत्तर रेल्वेमध्ये ३,२०० किमी मार्गावर ऑप्टिकल फायबर नेटवर्कसाठी ४००.८६ कोटी, तर उत्तर मध्य रेल्वेमध्ये २,१९६ किमी मार्गासाठी १७६.७६ कोटींची तरतूद आहे. दक्षिण मध्य रेल्वेतील ४९ स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बसवण्यात येणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाताला सुरुवातीला दोन झटके मिळाले. फिन अॅलन आणि ग्रीन हे दोघे फलंदाज बाद झाले आहेत. चौथं षटक सुरू असतानाच पावसानं हजेरी लावली. त्यामुळं सामना थांबवावा लागला. कोलकाताच्या २ बाद २५ धावा झाल्या आहेत. अजिंक्य रहाणे आणि रघुवंशी सध्या खेळत आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे खेळवला जात आहे. घरच्या मैदानावर खेळताना कोलकाताने मोठा स्कोअर उभारण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघ सुरुवातीपासूनच आक्रमक गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याच्या तयारीत आहे. या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहत येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी विरोधात नागरिकांनी मोर्चा काढला. पी फास उत्पादनामुळे पर्यावरण व आरोग्यावर धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत कोकण नागरी संघर्ष समिती, पर्यावरण संरक्षण समिती व स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन केले. घातक रसायनांच्या उत्पादनावर बंदी घालावी व धोकादायक प्रकल्प तातडीने बंद करावेत, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात महिला, युवक, शेतकरी व विविध संघटनांचा मोठा सहभाग होता.
ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचं अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
परभणी जिल्हा पूर्णा तालुक्यातील पांगरा गावात ग्रामपंचायत मध्ये झालेल्या विविध योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार चौकशी साठी गावातीलच तरुण शेतकरी पंढरीनाथ नामदेव ढोणे यांनी ता आज पासून भारत निर्माण पाणीपुरवठा टाकी उंच जलकुंभावर बसून अमरण उपोषण चालू केले आहे.
आखाती देशातील युद्धामुळे एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचे केंद्र सरकारने योग्य नियोजन करावे.
सरकारकडून नियोजन केले जात नसल्याने सामान्य जनतेला एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईचा सामना करावा लागत आहे. गॅस बुकिंग केल्यावर महिन्याबराने ग’स सिलेंडर मिळत आहे.
गॅस सिलेंडर टंचाई दूर करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल पावशे यांच्या नेतृत्वात आज कल्याण तहसील कार्यावर धडक मोर्चा काढण्यात आला.
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या रवींद्र एरंडेला ४ दिवसांची पोलीस कोठडी
नराधम रवींद्र एरंडेला न्यायालयाने सुनावली ४ दिवसांची पोलीस कोठडी
उद्योजक आणि NGO संस्थाचालक रवींद्र एरंडेने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं तपासात समोर
पीडित महिलांचे जबाब, हार्ड डिस्कमधील डेटाचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी पोलिसांनी मागितली होती एरंडेची पोलीस कोठडी
सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने एरंडेला सुनावली ४ दिवसांची पोलीस कोठडी
भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुणे शहर पोलिसांकडून तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पुणे लष्कर न्यायालयाने फेटाळली
बारामती पोटनिवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले
बारामती निवडणूक अधिकारी स्वप्निल रावडे यांची माहिती
मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवत आहेत
बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्नशील असलेल्या निवडणुकीत ५५ अर्ज दाखल
सांगली जिल्ह्यामध्ये खुनांची मालिका सुरूच असून 24 तासात घडलेल्या दोन घटनांमुळे सांगली जिल्हा पुन्हा हादरून गेला आहे.
सांगलीतील कवलापूर येथे यात्रेमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या विश्वास कलाप्पा सुतार या 32 वर्षे तरुणाच्या डोक्यात त्याच्याच मित्राने दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
याप्रकरणी रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. दारूच्या नशेत यात्रेमध्ये फिरताना एकमेकांचा धक्का लागल्याने तसेच शिवीगाळ केल्याने ही कुनाची घटना घडली.
कल्याण ते टिटवाळा सिग्नल यंत्रणा बिघाड
आंबिवली रेल्वे स्थानकापासून लोकल ट्रेनच्या रांगा
कल्याण ते कसारा वाहतूक विस्कळीत
शिवसेनेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे आणि भाजपाचे अक्षय गोरंट्याल यांच्यात शाब्दिक हमरी-तुमरी झाली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महात्मा फुले मार्केट उभारणी प्रश्नावर चर्चा दरम्यान भाजप-शिवसेनेचे नगरसेवकामध्ये हमरी तुमरी झाली.
आज फक्त उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अजूनही वेळ आहे ज्यांनी निवडणुकीचे अर्ज दाखल केलेले आहेत ते माघार घेऊन निवडणूक बिनविरोध होऊ शकते. याचा अर्थ बिनविरोध साठी अजूनही भेटीगाठी बोलणी सुरू आहे.
अमरावतीमध्ये टमाटर उत्पादक शेतकरी संकटात. टमाटर चा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी टमाटर फेकले शेताच्या बाहेर...
बाजारपेठेमध्ये टमाटरला प्रती किलो 4-5 रुपये प्रति किलो एवढा दर..
बाजारपेठेमध्ये टमाटर ची आवक वाढल्याने टमाटर कोणी घेईना
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अक्षरश अंधारात ढकलले गेले आहे.महाराष्ट्र शासनामार्फत सुमारे ७५ विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठविण्यात आले.
पुण्याच्या चाकणमध्ये बारामतीहून कार विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
बातमीय बीड मधून आपल्या शिस्तप्रिय आणि करारी बाण्यामुळे 'धडाकेबाज अधिकारी' म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री अश्रुबाई हरिभाऊ मुंढे यांचे दुःखद निधन झाले आहे. बीड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी ताडसोन्ना येथे त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका निवासी डॉक्टरने भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. मंदार दाभाडे असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. ते ‘स्वाराती’ रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेत होते.
गोरेगाव संतोष नगर परिसरात दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून परिसरात रस्ता जाम करण्यात आला नशेचे पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीच्या घरावर पालिकेने तोडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांसोबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
मुस्लिम समाजाचे एसीबीसी चे पाच टक्के आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये 17 एप्रिल रोजी निघणार आहे. या संदर्भात आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने माहिती दिली. मोर्चाचे नियोजन पूर्ण झाले,असून हा मोर्चा ऐतिहासिक होणार आहे. सरकारने या संदर्भात तात्काळ उपाययोजना कराव्यात व मुस्लिम आरक्षणा संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी ही यावेळी समन्वयकांनी केली.
बीडच्या आष्टी तालुक्यातील वाळूंज येथे 200 वर्षांची परंपरा असलेल्या भैरवनाथ यात्रेला जल्लोषात सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या पारंपरिक फड मिरवणुकीने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. पण या यात्रेत सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या अनोख्या अंदाजात थेट हातात ढोल घेत उत्साहाने ढोल वाजवत मिरवणुकीत सहभाग घेतला तर त्यांच्या ढोलवर नृतिकांनी ठेका धरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, भैरवनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती, तर आमदार धस यांचा ढोल वाजवतानाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
राहुरी विधानसभा पोट निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी मोठा घडामोडी घडत असून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने गोविंदराव मोकाटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. अर्ज भरण्याच्या अर्धा तास आधी महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेले उद्धवा बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोविंदराव मोकाटे यांनी अर्ज दाखल केला आहे.
खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीचा पाठलाग करताना पोलिसांवर गोळीबार.
स्वरक्षणार्थ पोलीसांनी आरोपीवर झाडली गोळी.
अंकुश गंधमवार पोलीस गोळीबारात जखमी.
आज सकाळी सोनू कल्याणकर या तरुणाचा झाला खूण.
खुणातील एकूण चार आरोपीना अटक.
केडीएमसीत तीन समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड
केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती पदी मल्लेश शेट्टी
शिक्षण समिती पदी अभिजत थरवळ तर महिला कल्याण समिती सभापती सारीका जाधव
डोंबिवली पूर्वेतील गोपाळ नगर 2 परिसरातील घटना
आधार नावाच्या इमारतीतील पहिल्या मजल्या वरील घराचा स्लब तळ मजल्यावरील घरावर कोसळून 1 जण जखमी
इमारतीत अडकलेल्या एका वयोवृद्ध महिलेला फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले
घटना स्थळी अग्निशमन पथक , केडीएमसी अधिकारी कर्मचारी दाखल
इमारत रिकामा करण्याचे काम सुरू
दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुक लढवणार आहेत. आज निवडणुक आयोगाकडे केला अर्ज दाखल केला आहे. एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळेदेखील उपस्थित होते.
डोंबिवली एमआयडीसी मधील महिलांचा सायकल सखी ग्रुप हा सामाजिक, पर्यावरण, आरोग्य हे उद्दिष्ट ठेवून अनेक विविध कार्यक्रम करीत असतात. दरवर्षी ह्या ग्रुपच्या महिला आणि काही पुरुष मंडळी सायकलने पंढरपूर आषाडीवारी साठी जात असतात.
अशोक खरातच्या ईडी तपासाबाबत महत्वाची घडामोड समोर आली आहे. SIT कडून खरातच्या जमिन व्यवहारांबाबत बनवला जाणार सविस्तर अहवाल.
धाराशिवच्या भूम तालुक्यातील ईट, गिरविली ,अंजनसोनडा , सोनेवाडी गावातील शेकडो शेतकऱ्याचं रास्ता रोको सुरु झालं आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारा विरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजी नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवला आहे.
राष्ट्रवादीच्या मेळाव्याला चाकणकर गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या सगळे नेते उपस्थित असताना चाकणकर यांच्या गैरहजेरी मुळे त्या पक्षावर नाराज आहेत का अशा देखील चर्चा सुरु आहेत.
बातमीय बीड मधून दोन देशातील आखाती युद्धाचा फटका देशभरामध्ये बसत आहे त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये युद्धाचा फटका कायम असून गॅस टंचाई देखील कायम आहे बुकिंग केल्याशिवाय गॅस मिळत नाही.
हसन मुश्रीफ यांच्या भाषणातील मुद्दे
ज्या दिवशी विमान अपघात घडला त्यातून आपल्याला विश्वास बसत नाही
आपण हाडाची काडी आणि रक्ताचं पाणी होईपर्यंत सुनेत्रावहिनींच्या पाठीशी उभे राहू
जर निवडणुकीचे अर्ज मागे घेतले नाहीत तर आपण असं भाषण करू की देशात सर्वात जास्त असलेल्या रेकॉर्ड ब्रेक करून निवडणूक होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीचा मेळावा
राष्ट्रवादीच्या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सगळे नेते उपस्थित
अजित दादांच्या आठवणींना नेत्यांकडून उजाळा
मंचावर राष्ट्रवादीचे नेते:
सुनेत्रा पवार
दत्तात्रय भरणे
प्रफुल्ल पटेल (काही वेळात येतील)
धनंजय मुंडे
बाबासाहेब पाटील
सुनील तटकरे
अदिती तटकरे
अनिकेत तटकरे
संजय बनसोडे
दिलीप वळसे पाटील
नरहरी झिरवळ
सना मलिक
राज्यसभेत शरद पवारांनी खासदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्रातील खासदारांनी देखील शपथ घेतली.
- नागपुरातील १४ वर्षीय अथर्व मनोरे अपहरण आणि हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक...
- शेजारी राहणाऱ्या जयराम गोपाल यादव या मित्रानेच खंडणीसाठी केलं होतं अपहरण
- आरोपी केतन उर्फ कुणाल रमेश शाहू आणि आयुष मोहन शाहू या दोघांच्या मदतीनं केलं अपहरण
- ४० ते ५० लाखांच्या खंडणीसाठी केलं होतं अपहरण....
- पण अथर्व बेशुद्ध होत नव्हता, त्यामुळे त्याला मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला...
- त्र्यंबकेश्वरमध्ये पुन्हा दलालांकडून भाविकांच्या लुटीचा व्हिडिओ व्हायरल
- भाविकांकडून स्वतः दलालांकडून लूट होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
- ३ हजार घेऊन थेट दर्शनाचं आमिष दाखवून दलालांकडून भाविकांची आर्थिक लूट केली जात असल्याचं भाविकांची तक्रार
- याआधी देखील त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची लूट केली जात असल्याचे प्रकार आले होते समोर
मुंबईतील मालाड पूर्व येथील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतोष नगर मार्केट परिसरात दोन गटामध्ये तणाव निर्माण होऊन मारामारी झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुनेत्रा पवार आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार
त्याआधी अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला भेट
विद्या प्रतिष्ठान येथे केले अजित पवारांच्या स्मृती स्थळाला भेट देत केले अभिवादन
भाजप हा काम करणाऱ्यांना संधी देणारा पक्ष असून एक दिवस पृथ्वीराज देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन येईल आणि त्यांना संधी मिळेल, अशा शब्दात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी पृथ्वीराज देशमुखांच्या आमदारकी बाबतीत सूचक विधान केले आहे.कडेपूर या ठिकाणी पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये बोलताना चंद्रकांत पाटलांनी हे सूचक विधान केलं आहे,आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला.
हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा रद्द
पुण्यात माध्यमांशी बोलणार होते तेही झालं रद्द
हर्षवर्धन सपकाळ तातडीने केरळकडे रवाना
पूर्वनियोजित दौरा असल्याने बारामती दौरा रद्द
आकाश मोरे काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत भरणार अर्ज
सुनेत्रा पवार आज बारामती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो! तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल..!
रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं आहे. येथील रहिवासी रुपेश रघुनाथ सावंत यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये बिबट्या दिसून आला असून, त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. सावंत कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून हा बिबट्या या परिसरात वावरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. परिसरातील अनेक भटक्या कुत्र्यांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, याबाबत ठोस पुरावा नव्हता. आता सीसीटीव्ही फुटेजमुळे बिबट्याच्या उपस्थितीला दुजोरा मिळाला आहे. वन विभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी सावंत कुटुंबियांनी केली आहे.
चिखलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्यावर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. सरकारी सेवेत असूनही राजकारणात हस्तक्षेप आणि भाजप कार्यक्रमांत सहभाग घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महालेंच्या निलंबनाची मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून प्रकरणामुळे स्थानिक राजकारण तापले आहे....
भोंदू अशोक खरात प्रकरणी एक महिला अधिकारी रडारवर
SIT तपासात या तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर आल्याची सूत्रांची माहिती
नाशिकमध्ये पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर केली होती भोंदू अशोक खरातला मदत केल्याचा संशय
त्या बदल्यात अशोक खरातने देखील आपलं नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला दिली पाहिजे असलेली पोस्टिंग
या महिला अधिकाऱ्याचे काळे पैसे देखील खरातने पांढरे केल्याचा संशय
नाशिकची तत्कालीन महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची देखील सूत्रांची माहिती
सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर छुप्या पद्धतीने सट्टा लावणाऱ्यांविरुद्ध भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. तुमसर शहरात सुरू असलेल्या या सट्टेबाजीचा पर्दाफाश करत पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून २६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना तुमसर शहरात ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे च्या रात्री तुमसर येथील मुकेश भजीया सेंटर या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला.
मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले; मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांचा पुढाकार. बंदी उठवल्यानंतर पार पडली महाआरती.
आदिवासी व स्थानिक नागरिकांच्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या काही प्रमुख देवस्थानांवर वनविभागामार्फत घालण्यात आली होती बंदी..
या बंदीमध्ये सेमाडोह येथील भूमकाबाबा,हतरू येथील डवरादेवबाबा,तारुबांदा येथील कांद्रीबाबा तसेच कोकमार येथील नरसिंगबाबा या प्रमुख देवस्थानांचा समावेश होता.
ही सर्व देवस्थाने स्थानिकांच्या श्रद्धा, आस्था आणि सांस्कृतिक परंपरेशी घट्ट जोडलेली असल्याने बंदीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर आमदार केवलराम काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपा विरोधात महाविकास आघाडीची भूमिका काय असणार याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. खरंतर भाजपाचे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे चिरंजीव अक्षय कर्डीले यांना भाजपाकडून उमेदवारी जाहिर झाली असून कर्डीले आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. मात्र त्यांच्या विरोधात माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी काल रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेत सवांद साधला. मात्र या बैठकीत अंतिम निर्णय न घेता त्यांनी रात्रीचा वेळ मागितल्याने उत्सुकता अधिकच वाढली आहे.
नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून पुढील दोन दिवस शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे… सदर परिसरातील मुख्य जलवाहिनीवर वॉल्व्ह बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे… हे काम ७ एप्रिल सकाळी १० वाजल्यापासून ते ८ एप्रिल रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे…
धाराशिव जिल्ह्यात मार्च व एप्रिल मध्ये ही अवकाळीने कहर केला असुन यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.सलग पडणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागासह रब्बी हंगामातील बायागती व जिरायती पिकांचे मोठ नुकसान झाल आहे.याबाबत कृषी विभागाने मार्च महीन्यातील 1407 हेक्टरच्या नुकसानीचे पंचनामे केले असुन शासनाकडे प्राथमीक अहवाल पाठवला आहे.तर एप्रिल मधील नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा प्रश्न गंभिर आहे. सद्या ग्राम पंचायतीमार्फत आठवड्यातुन एक वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. किल्ले रायगडामुळे येथे पर्यटक येतात मात्र पाणी नसल्याने त्यांचे हाल होतात. येथील हॉटेल व्यवसायीकांना पाणी विकत आणाव लागत. पाणी टंचाईच गाऱ्हाण ग्रामस्थांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यासमोर मांडल. यावेळी संबधीत अधिकारी, पाचाडच्या सरपंच सिमा बेंदूगडे यांची बैठक बोलावुन वाकडीकर यांनी एक महिन्यात काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. एक महिन्यात पाणी पुरवठा सुरु झाला नाहीतर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी दिला आहे.
भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बारामती मध्ये राहणार उपस्थित
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बावनकुळे राहणार उपस्थित
पुण्यात भाजपच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपवून बावनकुळे बारामतीत येणार
मुंबई -
मालाड पूर्व संतोष नगर येथे दोन गटात तुफान हाणामारी
मुंबईतील मालाड पूर्व दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतोष नगर मार्केट परिसरात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
संतोष नगर परिसरातील ज्योती बार अँड रेस्टॉरंट जवळ हा प्रकार घडल्याची माहिती.
घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल.
बारामती -
बारामती पोटनिवडणूक अपडेट
सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार
काँग्रेसचे आकाश मोरे निवडणुकीच्या रिंगणात
शिरूर तालुक्यातील आपटी येथे राम गाडेकर यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला.
मात्र शेतकऱ्याने धाडसाने प्रतिकार केल्याने बिबट्याने धूम ठोकली.
बैलाच्या मानेवर व पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून घरगुती उपचार करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.