maharashtra government jobs recruitment 2026 AI Image
मुंबई/पुणे

MPSC Recruitment : मोठी बातमी! MPSC च्या विद्यार्थ्यांना दिवाळी भेट; १६७१७ पदांसाठी भरती

MPSC Recruitment Update News : एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी पदसंख्या वाढवून 16,717 करण्यात आली आहे. लिपिक-टंकलेखक, तलाठीसह विविध पदांसाठी भरती होणार असून 13 ते 27 नोव्हेंबरदरम्यान उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत आता 16,717 जागा भरल्या जाणार

  • राज्यातील 25 प्रशासकीय विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार

  • उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सूट देण्यात आली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत भरती होणाऱ्या पदांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. आधी जाहीर केलेल्या पदांमध्ये वाढ करून आता एकूण 16 हजार 717 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भात नवीन पत्रक प्रसिद्ध केले आहे. राज्यातील सरकारी भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर विविध विभागांकडून मिळालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील 25 प्रशासकीय विभागांमध्ये एकूण 16,717 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये लिपिक-टंकलेखक पदांसाठी सर्वाधिक 3,966 जागा आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागात 3,911 पदे भरली जाणार आहेत. तर महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी पदांसाठी आता 1,840 जागा उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीमध्ये विविध पदांसाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार जागांचा तपशीलही देण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना आपल्या प्रवर्गानुसार उपलब्ध जागांची माहिती मिळवता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आणखी एक महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. शासनाने कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाढीव जागांमुळे उमेदवारांना नव्याने अर्ज किंवा पदांचे विकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

असा करा ऑनलाइन अर्ज

इच्छुक उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर ONLINE FACILITIES मधील Online Application System हा पर्याय निवडावा. नवीन उमेदवारांनी New User Registration करून नोंदणी करावी. आधीच नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉगिन करावे. त्यानंतर Online Application मध्ये जाऊन महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 निवडावी आणि आवश्यक माहिती भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीचा सस्पेन्स अखेर संपला

Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी काय सांगितलं?

Maharashtra Forts : मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक! महाराष्ट्रातील ७ अभेद्य किल्ले, शत्रूला जिंकणे होतं कठीण

IND vs NZ : भारताने पुन्हा नाणेफेक जिंकली; प्रथम फलंदाजी कोण करणार? पाहा प्लेईंग ११

Actor Threat Case : बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक, चौकशीत धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT