Government Holiday Saam Tv
मुंबई/पुणे

Government Holiday: २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

Government Holiday on 2 December 2025: २ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhi Hande

२ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी निर्णय

कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी महत्त्वाचा निर्णय

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या २ आणि ३ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे, याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यात सरकारी सुट्टी जाहीर (Government Holiday on 2nd December)

जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपचांयतीच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे.

मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे. केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील, येत्या 2 डिसेंबर रोजी पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

२ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. मतदारांना मतदान करता यावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे.ज्या ज्या मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. त्या मतदारसंघात सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बँका, शासकीय कार्यालये बंद असणार आहेत. त्यामुळे तुमचे २ डिसेंबरला बँकेत काही काम असेल तर जाऊ नका.

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

आता राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूकीसाठी प्रचारासाठी मुदत वाढवली आहे. आता १ डिसेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. अपत्र आणि उमेदवारांना उशिरा चिन्ह मिळालेल्यांना दिलासा मिळणार आहे. आता उमेदवारांना मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत प्रचार करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Picnic Travel : कडाक्याच्या थंडीत मुंबईतील या ठिकाणांना द्या भेट, विकेंडला करा खास कुटुंबासोबत पिकनीक प्लान

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

ZP Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी जाहीर होणार? महत्त्वाची माहिती समोर आली

जाग आली अन् बाजुला २ पुरूष, स्ट्रगलिंग मॉडेलनं कॉलेज तरूणीला फसवलं, अश्लील VIDEO व्हायरल करण्याची धमकी अन्..

Mumbai Beaches : विकेंडला फिरायला जायचा प्लॅन करताय? मग मुंबईजवळील या बीचला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT