Mumbai Metro 11 Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro 11: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! वडाळ्यावरुन थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, नव्या मेट्रो मार्गाला मंजुरी

State Gov Approves Metro Line 11 Wadala to Gate Way Of India: राज्य सरकारने वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया या मेट्रो लाइनला परवानगी दिली आहे. या मेट्रो लाइनमुळे मुंबईकरांचा प्रवास खूप जलद आणि सोपा होणार आहे.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मेट्रो लाइनला परवानगी

लवकरच मेट्रो ११ चं काम होणार सुरु

मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अजून सोपा होण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सरकारने मेट्रो ११ ला परवानगी दिली आहे. बहुप्रतिक्षित मेट्रो लाइन ११ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. मेट्रो लाइन ११ ही वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत असणार आहे. या मेट्रोला सरकारने अधिकृतपणे परवानगी दिली आहे.

खर्च

मेट्रो लाइन ११ साठी २३,४८७.५१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये मेट्रो डेपो तयार करण्याचाही समावेश असणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली आहे.

१७.५१ किलोमीटरची मेट्रो लाइन

मेट्रो लाइन ११ ही मेट्रो 4/4A चा विस्तार आहे. ही १७.५१ किलोमीटर लांब असणार आहे. या मार्गात १३ भूमिगत त १ अॅट ग्रेड स्टेशन असणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतली आहे.

वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया जोडणार (Wadala To Gate Way Of India Metro 11)

ही मेट्रो मार्गिका वडाळावरुन सुरु होणार आहे. वडाळा, शिवडी, फिरोजशाह मेहता रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि काळा घोडा मार्गे गेट वे ऑफ इंडियाकडे जाणार आहे.

दक्षिण मुंबईसाठी गेम चेंजर प्रकल्प

संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे पसरत आहे. काही वर्षात संपूर्ण मुंबईत तुम्हाला मेट्रोने प्रवास करता येणार आहे. ही नवीन मेट्रो लाइन ११ दक्षिण मुंबईसाठी गेम चेंजर ठरणार आहे. सध्या वडाळ्याहून कुलाबा आणि गेट वे ऑफ इंडियाला पोहचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे खूप वेळ वाया जातो.

या नवीन मेट्रो लाइमुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवरील ताण कमी होईल. मुंबईत सध्या ८१ किलोमीटरपर्यंत मेट्रो आहे. भविष्यात ३३७ किलोमीटरपर्यंत मेट्रोचे जाळे तयार करण्याचे नियोजन आहे. यामध्ये एकूण १६ मेट्रो लाइन्सचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

Panchgrahi Yog: जानेवारीमध्ये शनीच्या राशीत बनणार पॉवरफुल पंचग्रही राजयोग; नव्या वर्षात 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५०० येणार; तीन महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता

राज्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना, आठवीतील मुलीवर सामूहिक बलात्कार, विवस्त्र सोडून दोघे पळाले

पुन्हा संतोष देशमुखांसारखी हत्या, संभाजीनगरात माजी सरपंचाचा खून, ११ जणांनी लोखंडी रॉड अन् लाठ्या-काठ्यांनी मारले

SCROLL FOR NEXT