Maharashtra Political News
Maharashtra Political News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आमदारांचा आक्षेप; विधीमंडळाने घेतला मोठा निर्णय

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Mumbai News: विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यासंदर्भात मोठी बातमी हाती आली आहे. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलण्यात येणार आहे. यासाठी विधीमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा दिसणार आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलण्यात येणार आहे. यासाठी विधीमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना केली असून सोमवारी समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.

विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता नव्या रुपात दिसणार आहे. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलण्यासाठी पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे काम हे सर जे जे कला महाविद्यालयास देण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का बदलण्यात येतोय?

सध्या अस्तित्वात असलेल्या पुतळ्यासंदर्भात काही आमदारांचा आक्षेप आहे. त्यामुळे विधानभवनातील शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा बदलण्यात येणार आहे. आता सिंहासनावर आसनस्थ नवीन पुतळा तयार करणार येणार आहे. विधान भवनातील शिवाजी महाराज पुतळ्याबाबत आक्षेपानंतर विधीमंडळाने पुतळा बदल्याणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विधानभवनात आता शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा दिसणार आहे.

विधीमंडळाच्या पुतळा समितीत कोण असणार?

विधानसभा अध्यक्ष - राहुल नार्वेकर

विधान परिषद उपसभापती - नीलम गोऱ्हे

मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

उपमुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते अजित पवार

आमदार रामराजे निंबाळकर

आमदार शिवेंद्रराजे भोसले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT