kumar ailani saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Ulhasnagar Vidhansabha Result, Kumar Ailani vs Omie Kalani: उल्हासनगर शहरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

Ulhasnagar Vidhansabha Result: राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. उल्हासनगर मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) गट अशी लढत पाहायला मिळाली. या लढतीत, भाजपने मोठा विजय मिळवल्याची माहिती समोर येत आहे.

उल्हासनगर मतदारसंघातून भाजपकडून कुमार आयलानी, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ओमी कलाणी निवडणुकीच्या रिंगणात होते. १९ फेरीच्या मतमोजणीनंतर कुमार आयलानी यांनी ३०७५४ मतांनी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे कुमार आयलानी यांचा विजय निश्चित झाला आहे.

उल्हासनगर मतदार संघातून भाजपकडून कुमार आयलानी, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ओमी कलाणी, वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून संजय गुप्ता आणि मनसेकडून भगवान भालेराव मैदानात होते.

मात्र प्रमुख लढत कुमार आयलानी आणि ओमी कलाणी यांच्यात पार पडली. दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला. १९ व्या फेरीनंतर भाजपच्या कुमार आयलानी यांनी ८२२३१ मत मिळवली. यासह ओमी कलाणींवर ३०७५४ मतांनी विजय मिळवला. ओमी कलाणी यांना ५१४७७ मतं मिळाली.

यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ज्योती कलाणी यांचा ३५४०६ मतांनी पराभव केला होता. त्यापूर्वी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या १८६३ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

SCROLL FOR NEXT