Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  SAAM TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis On Bailgada Sharyat: 'हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा मोठा विजय', बैलगाडा शर्यतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Priya More

Pune News: राज्यामध्ये आता बैलगाडा शर्यत (Bailgada Sharyat) घेता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने अखेर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींबाबत महत्वपूर्ण निकाल दिला. कोर्टाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना परवानगी दिला आहे. बैलगाडा शर्यत कायदा सुप्रीम कोर्टाने वैध ठरवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी आनंद व्यक्त करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. '12 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर यश आलं. आम्ही सर्वजण आनंदी आहोत. हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा मोठा विजय आहे.', अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

बैलगाडा शर्यतीसंदर्भात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'बैल हा धावणारा प्राणी आहे हे आम्ही सिद्ध केलं. आमचं सरकार असताना रिपोर्ट तयार केला. मी मुख्यमंत्री असता हा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर केला. आमचं नवीन सरकार आल्यानंतर आम्ही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विनंती करुन महाराष्ट्राच्या वतीने उभं राहण्यास सांगितले. बैल हा धावणारा प्राणी आहे हा आमचा रिपोर्ट सादर केला गेला.'

फडणवीसांनी सांगितले की, 'हा कायदा वैध आहे. या कायद्यामध्ये सर्व खबरदारी घेतल्या आहेत. प्राण्यांवर अन्याय करणारा हा कायदा नाही. या कायद्यात हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. आम्ही केलेला कायदा हा सर्वार्थाने संविधानिक आहे अशाप्रकराचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. आजच्या निर्णयावर आम्ही सर्वजण आनंदी आहोत. हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा मोठा विजय आहे.'

तसंच, 'आमच्या वकिलांच्या टीमने उत्तम काम केले. आपल्या इकडची अनेक लोकं याचा पाठपुरावा करत होते. आम्ही केलेली मेहनत खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आहे. आम्ही केलेला कायदा आणि रिपोर्ट या दोन्ही गोष्टी सुप्रीम कोर्टाने योग्य ठवरल्या आहेत. 12 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर आम्हाला यश मिळालं आहे.', असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात

Health Tips: रात्री झोपण्यापूर्वी चालल्याने काय फायदा होतो?

Onion Export: 'साम' च्या बातमीचा इम्पॅक्ट; आता गुजरातसोबत महाराष्ट्रातल्या कांद्याचीही निर्यात

Ujjwal Nikam At Siddhivinayak Temple | उज्ज्वल निकम उमेदवारीनंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

Maharashtra Politics | माढ्यात Sharad Pawar गटाला धक्का! Dhaval Singh Mohite Patil भाजपमध्ये जाणार?

SCROLL FOR NEXT