Eknath Shinde Press Conference Saam Tv News
मुंबई/पुणे

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

Eknath Shinde Press Conference : 'मी नेहमीप्रमाणे भाषणाच्या शेवटी 'जय हिंद, जय महाराष्ट्र' बोलतो. 'जय हिंद' म्हणजे आपल्या देशाचा अभिमान आणि 'जय महाराष्ट्र' म्हणजे आपल्या राज्याचा अभिमान. मी 'जय गुजरात' यामुळे बोललो की, समोर बसलेले लोकं सर्व गुजरात समाजाचे होते, ते गुजराती होते.

Prashant Patil

मुंबई : राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्याच चुकीने अंगावर नसते संकट ओढावून घेतलं आहे. आज पुण्यातील कोंढवा कन्व्हेंशन सेंटरमधील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे अमित शाह यांच्या कौतुक करत होते. अमित शाह यांचे कौतूक करताना एकनाथ शिंदे हे अनेक विशेषण आणि उपमांचा वापर करत होते. मात्र, भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी, 'जय हिंद, जय महाराष्ट्र', असं म्हटलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना काहीतरी आठवलं आणि त्यांनी पुन्हा माईकजवळ येऊन 'जय गुजरात', असं म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्या या गुजरातच्या उल्लेखावरुन प्रचंड मोठा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत केलेल्या या घोषणेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, 'मी नेहमीप्रमाणे भाषणाच्या शेवटी 'जय हिंद, जय महाराष्ट्र' बोलतो. 'जय हिंद' म्हणजे आपल्या देशाचा अभिमान आणि 'जय महाराष्ट्र' म्हणजे आपल्या राज्याचा अभिमान. मी 'जय गुजरात' यामुळे बोललो की, समोर बसलेले लोकं सर्व गुजरात समाजाचे होते, ते गुजराती होते. त्यांनी वर्षानुवर्षे या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानलंय. जो काही प्रकल्प त्यांनी उभारला आहे आहे तो सर्व लोकांसाठी आहे. त्यांनी चांगलं काम केलं, त्यामुळे मी त्यांची प्रशंसा करायची म्हणून 'जय गुजरात' म्हणालो', असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय.

शिंदे पुढे म्हणाले की, 'मराठी आमचा श्वास आहे, हिंदू आमचा आत्मा आहे. टीका करणाऱ्यांना मी एकच सांगेन की, 'जिनके घर शिशे के होते है, उन्होंने पत्थर नहीं फेकने चाहीए', असं म्हणत शिंदेंनी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला प्रत्युत्तर दिलंय. याचदरम्यान, शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी गुजरातमध्ये जाऊन एका कार्यक्रमात 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात' असा नारा लावला होता. त्याचाच धागा पकडत त्यांनी तो व्हिडिओ दाखवला. त्यांनी अजून एक पोस्ट दाखवलीय. त्यात लिहिलं होतं की, 'मुंबईमा जलेबी आणे फापडा, उद्धव ठाकरे आपडा', या प्रकारचे दाखले देत शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर राज्यातील विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता शिंदे 'साहेबांसोबत कसं बोलायचं? केम छो एकनाथ शिंदे साहेब', असं म्हणत डिवचलं आहे. 'विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली होती. या सगळ्यातून एकच म्हणावं वाटतं विनाशकाले विपरीत बुद्धी', असंही पुढे ते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani House Firing: दिशा पाटनीच्या घरावर फायरिंग करण्याआधी शूटर्स दिसते पेट्रोल पंपावर; CCTV व्हिडिओ व्हायरल

Theur Flood : नैसर्गिक प्रवाह बंद करत प्लॉटिंग; मुसळधार पावसानंतर थेऊरमध्ये पूरस्थिती, ७ जणांवर गुन्हा दाखल

Accident: बुलडाण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रेलरला पाठीमागून धडक; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Navratri Colour History: लाल, पिवळा, हिरवा... नवरात्रीचे रंग कोणी ठरवले? काय आहे नऊ रंगाचा इतिहास?

SCROLL FOR NEXT