Maharashtra Corona Update Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Corona: महाराष्ट्रात कोरोना फोफावतोय! नव्या रुग्णसंख्येमुळं नागरिकांचं टेन्शन आणखी वाढलं

कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. आज राज्यात एका दिवसात ४२५५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात २ हजार ८७९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बरे होण्याचे प्रमाण ९८.८७ टक्के आहे. काही महिन्यांपासून कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी झाले होते, आता पुन्हा रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे.

आज दिवसभरात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या टेस्टपैकी ८,१४,७२,९१६ नमुन्यांपैकी ७९,२३,६९७ एवढ्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत.(Corona Latest News)

मुंबई विभाग - मुंबई महापालिका क्षेत्र, ठाणे, ठाणे महापालिका, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, मिरा भाईंदर महापालिका, पालघर, वसई-विरार महापालिका, रायगड, पनवेल महापालिका या परिसरात ३७१८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.(Corona)

नाशिक विभाग - नाशिक, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, अहमदनगर, अहमदनगर महापालिका, धुळे, धुळे महापालिका, जळगाव, जळगाव महापालिका, नंदुरबार आदी परिसरात कोरोनाचे ४१ नवीन रुग्ण आढळले.

पुणे विभाग - पुणे महापालिका, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, सोलापूर, सोलापूर महापालिका, सातारा आदी क्षेत्रांत ३४० नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

कोल्हापूर विभाग - कोल्हापूर, कोल्हापूर महापालिका, सांगली, सांगली महापालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या क्षेत्रात २५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.

औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, औरंगाबाद महापालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महापालिका या भागांत २१ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

लातूर विभाग - लातूर, लातूर महापालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महापालिका या भागात १३ नवीन कोविड ११ चा संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत.

अकोला विभाग - अकोला, अकोला महापालिका, अमरावती, अमरावती महापालिका, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या परिसरात १७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.

नागपूर विभाग - नागपूर, नागपूर महापालिका, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर महापालिका, गडचिरोली आदी भागात ८२ नवीन कोरोनाबाधित आढळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT