Maharashtra Corona Update
Maharashtra Corona Update Saam Tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे रुग्ण हजारांच्या पुढे; चौथ्या लाटेची सुरुवात तर नाही?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात पुन्हा कोरोनाने (Corona) डोके वर काढले आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे रुग्ण हजारांच्या पुढे आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेला पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज राज्यात १३५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५९५ रुग्ण बरे झाले आहेत.

आज १ रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के एवढे आहे. राज्यात आज ५८८८ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. पण आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Latest Corona Update)

राज्यात पुन्हा आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने रुग्णालये (Hospital), जम्बो कोविड सेंटर यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात आतापर्यंत ८,१०,३५,२७६ नमुण्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ७८,९०,३४६ नमुने कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आले आहेत. आज राज्यात १३५७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७८,९१,७०३ एवढी झाली आहे.

राज्यातील रुग्णांची आकडेवारी

मुंबई विभागात- ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल या शहरांचा समावेश आहे. या विभागात १२२७ नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.

नाशिक विभागात - यामध्ये नाशिक, नाशिक एमसी, मालेगाव एमसी, अहमदनगर, अहमदनगर एमसी, धुळे, धुळे एमसी, जळगाव, जळगाव एमसी, नंदुरबार यांचा समावेश आहे, या विभागात ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे विभागात- यात पुणे, पीएमसी, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर एमसी, सातारा यांचा समावेश आहे. या विभागात १०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर विभागात- कोल्हापूर, कोल्हापूर एमसी, सांगली, सांगली एमसी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात आज ७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.(Corona Latest News)

औरंगाबाद विभागात- औरंगाबाद, औरंगाबाद एमसी, जालना, हिंगोली, परभणी, परभणी एमसी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात ३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

लातूर विभागात- लातूर, लातूर एमसी, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड एमसी, या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात नव्या ३ रुग्णाची नोंद झाली आहे.

अकोला विभागात- अकोला, अकोला एमसी, अमरावती, अमरावती एमसी, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे, या विभागात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर विभागात- नागपूर, नागपूर एमसी, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, चंद्रपूर एमसी, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात ७ नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT