मुंबई: महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना (Corona) रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. आज राज्यात ११३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आज ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. बरे होण्याचे प्रमाण ९८.०६ टक्के एवढे आहे. राज्यात कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. राज्यात आज ५१२७ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. पण आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेला पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Latest Corona Update)
राज्यात आतापर्यंत ८,१०,०४१९३ नमुण्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ७८,९०,३४६ नमुने कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आले आहेत. आज राज्यात ११३४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७८,९०३४६ एवढी झाली आहे.
मुंबई विभागात- ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल या शहरांचा समावेश आहे. या विभागात १०२४ नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.
नाशिक विभागात - यामध्ये नाशिक, नाशिक एमसी, मालेगाव एमसी, अहमदनगर, अहमदनगर एमसी, धुळे, धुळे एमसी, जळगाव, जळगाव एमसी, नंदुरबार यांचा समावेश आहे, या विभागात ५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
पुणे विभागात- यात पुणे, पीएमसी, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर एमसी, सातारा यांचा समावेश आहे. या विभागात ९० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
कोल्हापूर विभागात- कोल्हापूर, कोल्हापूर एमसी, सांगली, सांगली एमसी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात आज ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.(Corona Latest News)
औरंगाबाद विभागात- औरंगाबाद, औरंगाबाद एमसी, जालना, हिंगोली, परभणी, परभणी एमसी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात १ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
लातूर विभागात- लातूर, लातूर एमसी, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड एमसी, या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात नव्या ० रुग्णाची नोंद झाली आहे.
अकोला विभागात- अकोला, अकोला एमसी, अमरावती, अमरावती एमसी, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे, या विभागात १ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
नागपूर विभागात- नागपूर, नागपूर एमसी, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, चंद्रपूर एमसी, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात ५ नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.