Corona Patients in Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Corona : मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती; BMC आयुक्तांचे निर्देश

मुंबईत गेल्या दोन दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत आहेत. सर्वात जास्त रुग्णसंख्या मुंबई महापालिका क्षेत्रातील आहे, त्यामुळे आता मुंबई महापालिका पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. आज आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतील आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. कोविड बाधीतांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या तातडीने वाढवण्याची सूचना तसेच जम्बो कोविड सेंटर, खासगी रुग्णालये (Hospital) व सर्व वॉर्ड वॉर रुम सुसज्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई महानगरात मागील काही दिवसांमध्ये कोविड (Covid) विषाणू बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोविड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आज ३ जून रोजी बैठक घेतली. याप्रसंगी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते.

कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून, त्यांचा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण याआधीच्या कोविड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज देखील खरे ठरले होते. कोविड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या अलीकडे वाढली आहे, हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही, असंही आयुक्त डॉ. चहल म्हणाले.

चाचण्यांचे प्रमाण वाढवा

मुंबईत कोरोना (Corona) चाचण्या सध्या ८ हजार होत आहेत, त्या आता वाढवून ३० ते ४० हजार चाचण्या करण्याचे निर्देश यावेळी दिले आहेत. चाचण्यांची संख्या वाढली तर त्यामुळे जास्तीत-जास्त बाधितांचा शोध घेणे सोपे होईल, परिणामी संसर्गाला अटकाव करता येईल. तसेच ज्या ठिकाणी कोरोना बाधित सापडेल त्याठिकाणील रहिवाश्यांची कोविड चाचणी करण्याच्या सूचना दिल्या.

जम्बो कोविड सेंटर सतर्क ठेवण्याची सूचना

कोविड रुग्णालयांना, जम्बो कोविड सेंटरांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. सुसज्ज यंत्रणा, वैद्यकीय मनुष्यबळ व इतर कर्मचारी नेमण्यात यावेत. विशेषतः अतिदक्षता उपचारांच्या रुग्णशय्या आणि त्यासाठी लागणारी वैद्यकीय संयंत्रे उपलब्ध ठेवावीत. जेणेकरुन रुग्णसंख्या वाढली तर, अडचण होऊ नये, अशाही सूचना दिल्या आहेत.

या आहेत सूचना

  • महानगरपालिकेच्या सर्व नियमित प्रमुख रुग्णालयांनी वाढीव रुग्णसंख्या दाखल करुन घेता येईल व त्यांच्यावर योग्य उपचार होतील, अशारितीने तयारी करावी. तसेच सर्व खासगी रुग्णालयांनादेखील आपापल्या स्तरावर सर्व तयारी करुन सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले जावेत.

  • मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत सर्व रुग्णालयांनी गरजेइतका औषधसाठा खरेदी करुन उपलब्ध करुन घ्यावा.

  • १२) कोविड विषाणूचे जनुकीय सूत्र निर्धारण अर्थात जिनोम सिक्वेसिंग करण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु ठेवावी. जेणेकरुन विषाणूचा कोणताही नवीन उपप्रकार वेळीच निदर्शनास येईल.

  • १३) सर्व झोपडपट्टी परिसरांमध्ये नियमितपणे संसर्ग प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी. विशेषतः झोपडपट्टयांमधील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये / शौचालयांमध्ये दिवसातून किमान ५ वेळा जंतुनाशक औषध फवारणी झालीच पाहिजे. जेणेकरुन, कोविडसह पावसाळी आजारांचा फैलाव रोखता येईल. या उपाययोजनांसाठी अधिकचा निधी आवश्यक असल्यास तो उपलब्ध करुन दिला जाईल.

  • १४) १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुला - मुलींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण जास्तीत-जास्त संख्येने करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. तसेच १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुला - मुलींचे देखील जलदगतीने लसीकरण करावे.

  • १५) वैद्यकीय औषधी दुकानांमधून विकले जाणाऱया सेल्फ टेस्टिंग कोविड कीटची आकडेवारी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त व्हावी, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यपद्धती सुनिश्चित करण्यात यावी.

  • १६) कोविड उपाययोजनांशी संबंधित तातडीचे प्रस्ताव, त्यांच्या नस्ती प्राधान्याने मार्गी लावाव्यात.

  • १७) पावसाळ्यात रस्त्यांवर होणारे खड्डे वेळेत भरले जावेत, यासाठी विभागीय नियंत्रण कक्ष अर्थात वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून नागरी समस्यांची दखल घेतली जावी. त्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) व उप आयुक्त (पायाभूत सुविघा) यांनी आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध करावी.

  • १८) सर्व रस्त्यांवरील / वाहिन्यांवरील झाकणे (मॅनहोल) व्यवस्थितरित्या आच्छादित आहेत, याची खातरजमा करण्यासाठी स्थानिक यंत्रणेला सर्व ठिकाणी निरिक्षण करण्याचे निर्देश देण्यात यावेत. पावसाळी पाणी साचण्याची ठिकाणे असलेल्या परिसरांमध्ये मॅनहोलच्या झाकणाखाली जाळी लावून सुरक्षिततेची अतिरिक्त उपाययोजना करण्यात यावी.

  • १९) संपूर्ण मुंबई महानगरात पावसाळी पाणी साचण्याची शक्यता असलेले ४७७ परिसर आहेत. या सर्व ठिकाणी पाणी उपसा करणारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या यंत्रणेवर देखरेख ठेवण्यासाठी व त्याचे संचलन करण्यासाठी विशेष समन्वयकांची नेमणूक करावी. जेणेकरुन, संभाव्य पूरस्थिती असे समन्वयक स्वतःहून उपस्थित राहून यंत्रणा सांभाळतील.

  • २०) पावसाळा सुरु झाल्यानंतर, सर्व उपाययोजनांची प्रत्यक्ष व्यवस्थित अंमलबजावणी होत आहे, तसेच पूरस्थिती अथवा नागरिकांना अडचणीची ठरु शकेल, अशी कोणतीही स्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेची सर्व संबंधित यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर उतरुन कार्यान्वित आहे, याची खात्री करावी. जेणेकरुन, तातडीने समस्येचे निराकरण होऊ शकेल.

पुढील एक, दोन आठवडे महत्त्वाचे

या बैठकीत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले की, पुढील एक दोन आठवडे कोविड परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बाधित रुग्ण शोधून काढणे हे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे. कोविड विषाणूचे नवीन उप प्रकार आढळले असले तरी त्यांच्या तीव्रतेबद्दल अद्याप भाष्य करता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री प्रारंभापासून आजही नियमितपणे मुखपट्टी (मास्क) चा उपयोग करतात. त्याचे पालन नागरिकांनी देखील करणे आवश्यक आहे. कोविड सोबत पावसाळ्यात येणारे जलजन्य आजारांचे आव्हान देखील आपल्यासमोर असेल. त्यामुळे ‘घर घर दस्तक’ सारख्या अभियानातून सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात, अशी सूचना डॉ. ओक यांनी केली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी कोविड सुसज्जतेसाठी खासगी रुग्णालयांची बैठक घेण्याची सूचना याप्रसंगी केली. त्यास अनुसरुन डॉ. गौतम भंसाली यांनी नमूद केले की, कालच सर्व खासगी रुग्णालयां समवेत बैठक घेण्यात आली आहे. या सर्व रुग्णालयांच्या संचालकांना आवश्यक ते निर्देश देऊन कोविड सुसज्ज राहण्याविषयी सूचित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांना दाखल करुन घेण्यासंदर्भातील कार्यपद्धती, कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार आकारावयाचे दर इत्यादींबाबत यापूर्वी निर्गमित केलेले आदेश पुन्हा एकदा प्रसारित करण्याची सुचनाही महानगरपालिका आयुक्तांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांना केली. तसेच महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये व आरोग्य व्यवस्थेमध्ये कोविड सदृश्य लक्षणे आढळणाऱया व्यक्तिंची कोविड चाचणी करण्याची व्यवस्था बाह्यरुग्ण सेवा विभागांमध्ये करण्यात यावी, अशी सुचनाही आयुक्तांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT