
शुक्रवार,२४ ऑक्टोबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष,स्वाती रवि,
तिथी-तृतीया २५|२०
नक्षत्र-अनुराधा
रास-वृश्चिक
योग-सौभाग्य
करण-तैतिल
दिनविशेष-शुभ दिवस
वाहनापासून स्वतःला जपा. अपघात योग संभवत आहेत. काळा पैसा, भ्रष्टाचार, लाचलुचपत यापासून धनलाभ आहेत. पण सावधगिरीचा विशेष इशारा आपल्या राशीला आहे.
संसारिक गोष्टींमध्ये अडकून रहाल. वैवाहिक जोडीदाराची इच्छा पूर्ण करण्यामध्ये दिवस व्यस्त राहील. मात्र त्याचवेळी कामाची धावपळ ही वाढलेली असेल. दोन्ही मधील एक छानसा सेतू सांधणे आज गरजेचे आहे.
श्वसनाच्या विकारांनी त्रस्त व्हायला होईल. रेंगाळलेले कामे आता जोरदार पद्धतीने सुरू होईल. दिवस व्यस्ततेमध्ये जाईल. शत्रू पिडा दिसते आहे.
संसारीक दृष्टीने लाभ होईल. संततीकडून शैक्षणिक दृष्टीने विशेष प्रगती आज दिसेल. संतती इच्छुकांना चांगल्या बातम्या कानावर येतील. लॉटरी आणि रेस मध्ये नशीब आजमावायला हरकत नाही.
नियोजित कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील. शेतीवाडी, गुरढोरे यापासून धनसंचय होईल. घरामधील वातावरण खेळीमुळेच राहील. आनंदाला उधाण येईल. दिवस चांगला आहे.
छोट्या प्रवासातून प्रगतीचे योग दिसत आहेत. शेजाऱ्यांच्याकडून अडचणीच्या वेळी मदत मिळेल. स्वतःतील हुनर शोधून कामाला लागाल. एक वेगळ्या प्रकारचे साहस आणि धाडस आज आपल्याकडे येईल.
जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. मात्र काही गोष्टी ह्या स्वतःला खांद्यावर जबाबदारी घेऊन कराव्या लागतील. कुटुंबामध्ये पोशिंदेपण स्वीकारून पुढे जावे लागेल.
एक नवी उमेद आणि आस्था घेऊन पुढे जाल. अनेकांची काम चुटकीसरशी आज करण्याची ताकद असेल. शांततेत "एकटा जीव सदाशिव" अशाप्रकारे कामे कराल. दिवस चांगला आहे.
काही वेळेला आपली चूक नसताना अनेक गोष्टींचे खापर आपल्यावर येते. या गोष्टींच्या बाबत सावधगिरी बाळगावी लागेल. दोलायमान अवस्था टाळा आणि पुढे जा.
लांब मुदतीची ठेव असेल पैशाचे गुंतवणूक असेल भले नात्यांची गुंतवणूक असेल तरीसुद्धा त्यातून आज आपल्याला रसरशीत फळे चाखायला मिळणार आहेत. आपल्या लोकांची किंमत विशेषत्वाने समजून येईल. लाभदायक दिवस आहे.
संशोधनात्मक कार्यामध्ये प्रगती होईल. आपल्या वरिष्ठांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आज सार्थ कराल. पेटून उठून कामे कराल. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तम घोडदौड होईल .
साधेपणाने भक्ती कराल. दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे. नातवंडाच्या सौख्याने मन आनंदी होईल. नवनवीन गोष्टींच्या कल्पनेच्या भराऱ्या आज घ्याल आणि पूर्णत्वास न्याल .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.