Maharashtra Corona Update Saam Tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; गेल्या २४ तासांत राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ

राज्यात आता ११ हजार ५७१ एवढे रुग्ण उपचार घेत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात २८१३ रुग्ण कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यामुळे राज्याची चिंता पुन्हा वाढली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ७९,०१,६२८ वर पोहोचली आहे. तर कोरोनाने मृत्यूची आकडेवारी १,४७,८६७ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत १,०४७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात आता ११ हजार ५७१ एवढे रुग्ण उपचार घेत आहेत.

सध्या महाराष्ट्रात ११ हजार ५७१ रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड १९ मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची सर्वात जास्त संख्या मुंबईतील आहे. आज मुंबईत १७०२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. (Maharashtra Corona Latest News)

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ, दिल्ली आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

मुंबई विभाग - मुंबई महापालिका, ठाणे, ठाणे महापालिका, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका, मीरा-भाईंदर महापालिका, पालघर, वसई विरार महापालिका, रायगड, पनवेल महापालिका आदी क्षेत्रांत एकूण १७०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vegetables Rates : कांदा, लसूण ते मेथी; भाजीपालाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Athiya अन् KL Rahul च्या घरी येणार नवा पाहुणा, नवी वर्षात होणार आई-बाबा

Acer Tablets: एक नंबर! १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील टॅबलेट लॉन्च, जाणून भन्नाट फीचर्स किंमत

Vastu Tips: संध्याकाळी देवी लक्ष्मी येण्याची योग्य वेळ कोणती?

Viral Video: १२ सेकंदाचा थरार! ३ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT