मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने विस्फोटक रुप धारण केले आहे. राज्यात एकाच दिवसात ९ हजार १७० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या राज्यात चिंतेचे वातावरण बनत आहे. आज राज्यात कोरोनाने ७ रुग्णांचा बळी घेतला आहे.
Mumbai Corona Update :
राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत असताना मुंबईत देखील झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात सगळ्यात जास्त रुग्ण मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंता वाढल्या आहेत. आज मुंबईत कोरोनाचे ६,३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. काल मुंबईत ५,६३१ रुग्ण आढळले होते. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. परवा ३,६७१ रुग्ण मुंबईत सापडले होते. तर ० मृत्यूची नोंद झाली होती.
Pune Corona Update :
मुंबई पाठोपाठ आता पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात आज तब्बल ६३१ नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. हि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लवकरच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील सध्याची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ३ हजार २७४ वर पोहोचली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.