CM Devendra Fadnavis on Bullet Train Saam TV News
मुंबई/पुणे

Bullet Train : २०२८ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

CM Devendra Fadnavis on Bullet Train Project : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली आहे.

Namdeo Kumbhar

CM Devendra Fadnavis on Bullet Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. मविआच्या काळात बुलेट ट्रेनचे काम बंद पडले होते, आता महायुती सरकारच्या काळात पुन्हा एकदा बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा ५०८ किलोमीटर लांबीचा आहे. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास अवघ्या २ तास ७ मिनिटांत पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित ही ट्रेन ३२० किमी/तास वेगाने धावणार आहे, तर तिचा कमाल वेग ३५० किमी/तास इतका आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी १५४.७६ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे, ज्यामध्ये मुंबई (बीकेसी), ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्थानके आहेत.

महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी राहणार नाही -

केंद्र सरकारने दिलेल्या नियमांनुसार महाराष्ट्रातील सर्व पाकिस्तानी लोक हे पाकिस्तानला जातील. एकही पाकिस्तानी हरवलेला अथवा बेपत्ता नाही. सर्वांची यादी आमच्याकडे आहे. पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या नगिरिकांच ट्रॅकिंग सुरू आहे. जे पाकिस्तानी नागरिक केंद्राच्या आदेशात बसतील ते भारतातून बाहेर जाणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदूबाबाच्या वेशात चोरी ; रांजणगावातील चोरटा सीसीटीव्हीत कैद

Shocking : नाशिकमध्ये भयंकर घडलं! दाजीनं सालीला पत्नीसमोर संपवलं; धक्कादायक कारण समोर

Deool Band 2 Collection : स्वामींच्या नावानं महाराष्ट्र दुमदुमला; प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'ची दुसऱ्या दिवशी बक्कळ कमाई, आकडा वाचून थक्क व्हाल

अपात्र लाडक्या बहीणींचा लाभ पुन्हा सुरू होणार? E- KYC केंद्रांवर वाढली महिलांची गर्दी

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

SCROLL FOR NEXT