Eknath Shinde SaamTv
मुंबई/पुणे

Eknath Shinde News : सत्तानाट्यानंतर खातेनाट्य सुरु, गृहमंत्रालयाच्या बदल्यात एकनाथ शिंदेंपुढे कोणते ३ पर्याय? मोठी अपडेट आली समोर

Mahayuti Ministry Posts Distribution : राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा काल पार पडला आहे. त्यानंतर आता खाते वाटपाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यात गृह खात्यावर ठाम असलेल्या एकनाथ शिंदे यांना कोणतं खातं दिलं जाणार याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

Saam Tv

राज्यात अखेर 11 दिवसांच्या सत्ता स्थापनेच्या नाराजी नाट्यानंतर गुरुवारी महायुतीचा शपथ विधी सोहळा पार पडला आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजित पवार असे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी काल शपथ घेत हे सरकार स्थापन केलं आहे. उपमुख्यमंत्री होण्याबद्दल एकनाथ शिंदे हे तयार नसल्याने शपथ विधी सोहळ्यात शेवटपर्यंत ट्विस्ट कायम होता.

सरकार स्थापन झाल्यानंतर आता महायुतीच्या खाते वाटपाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गृहमंत्रालयावर ठाम असलेलेल्या एकनाथ शिंदे यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने राज्याच्या राजकारणात खातेवाटपावरून पुन्हा मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्रिपदाबाबत नरमाईची भूमिका घेतलेले एकनाथ शिंदे हे गृहखात्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे गृह खात्यासारखं महत्वाचं खातं सोडायला भाजप तयार नाही. त्यामुळे यावेळी एकनाथ शिंदे काय भूमिका घेतील? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सत्तास्थापनेतही अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबद्दल नाराज होते. मात्र महायुतीच्या बहुमतात सर्वाधिक 132 जागांवर भाजपला विजय मिळाल्याने यावेळी मुख्यमंत्री भाजपचाच असावा याबद्दल भाजप पक्षश्रेष्ठींसह राज्यातले आमदार देखील आग्रही दिसून आल्याने हो ना करता करता अखेर मुख्यमंत्रिपद भाजपच्या खात्यात गेलं.

शपथ विधी सोहळ्याच्या काही तासांपूर्वीपर्यंत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेण्यास तयार नसल्याने भाजपने देखील त्यांच्याशिवाय शपथविधी करण्याची तयारी ठेवली होती. मात्र शिवसेनेच्या आमदारांनी मनधरणी केल्यानंतर शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी आपली तयारी दर्शवली. त्यामुळे आता गृहखात्याबद्दल शिंदे काय निर्णय घेतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, गृहमंत्रालय मिळावे यासाठी आग्रही असणाऱ्या शिंदेंना भाजपने हे खातं दिलं नाही तर त्या खात्याच्या तोडीसतोड खातं मिळवण्यासाठी शिंदेसेना आग्रही राहील, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. गृहखात्याच्या बदल्यात शिंदेंपुढे तीन पर्याय देण्यात आल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. गृहमंत्रालयाच्या बदल्यात महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम खातं असे 3 पर्याय शिवसेनेपुढे ठेवण्यात आले आहेत.

आता शिवसेनेकडून यातल्या एका खात्यावर विचार सुरू आहे. गृहखात्याइतकेच महत्वाचे, तोडीसतोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. पैकी ऊर्जा आणि गृहनिर्माण खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमी आहे असंही सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता यावर शिंदेंची भूमिका नेमकी काय असणार? त्यांना नेमकं कोणतं खातं मिळणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT