Maharashtra Cabinet third expansion will next week source information eknath shinde devendra fadnavis ajit pawar political updates Saam TV
मुंबई/पुणे

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला! भावी मंत्र्यांमध्ये आनंदी आनंद; कुणाची लागणार वर्णी?

Maharashtra Cabinet Expansion: राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Cabinet Expansion News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असून शनिवारी रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली.

यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल ४० बैठक झाली. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकीबाबत महायुतीची रणनिती याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अपडेट समोर येताच भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. आपल्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ मिळावी म्हणून अनेक इच्छुकांनी लॉबिंग सुरू केल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमक्या कोणत्या गटातील आमदारांना संधी मिळणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच होणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण हा विस्तार झाला नाही. आता अधिवेशनही संपलं आहे. तसेच निवडणुकांना 7 ते 8 महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर हा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्यूला काय?

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताचा तिसरा विस्तार पार पडणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यावेळी कशा पद्धतीने मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याचा फॉर्म्युलाही समोर आला होता. नव्या विस्तारात शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी चार तर अजितदादा गटाला दोन मंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जात आहे.

अजितदादा गट सरकारमध्ये आल्याने शिंदे गटाच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदाची संख्या प्रचंड घटली आहे. त्यामुळे इच्छुकांना मंत्रिमंडळात कसे सामावून घ्यायचे? हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर प्रश्न आहे.अनेकजण मंत्रीपद मिळेल म्हणून ठाकरे गट सोडून शिंदे यांच्यासोबत आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाला स्थान देणार, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "देवा" आता तूच आमच्या अण्णाला माफ कर, वसंत मोरे यांचे अनोखे आंदोलन

Diwali Padwa Gift: या दिवाळीत बायकोला करा खूश, या युनिक डिझाईन्सच्या अंगठ्या ठरतील परफेक्ट

Sangli News : पाडव्याच्या मुहूर्तावरील हळदीचा सौदा, प्रति क्विंटल १७,८०० रुपये भाव मिळाला, शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित

Apple Maps Privacy: यूजर्ससाठी प्रायव्हसी धोका! Apple Maps तुमचे लोकेशन ट्रॅक करत आहे, 'ही' सेटिंग लगेच बंद करा

Bigg Boss : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा, होणारा नवरा कोण?

SCROLL FOR NEXT