Devendra Fadnavis meets Ramesh Bais Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग? फडणवीस-राज्यपाल भेटीनंतर चर्चांना उधाण

Maharashtra Cabinet Expansion Soon : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार? उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Cabinet Expansion: गेल्या अनेक दिवसांपासून सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रडखडलेला आहे. याशीच संबंधित एक मोठी बातमी आता समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीस यांनी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला मंत्रिपद मिळावे - रामदास आठवले

यातच आता राज्य मंत्रीमंडळाच्या आगामी विस्तारात ‘रिपाइं’ला मंत्रिपद मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केली. (Latest Marathi News)

आठवले पुढे म्हणाले, "भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर मित्र पक्षांची मुंबईत बैठक झाली आहे. या बैठकीत आगामी मंत्रिमंडळ विस्तारत 'रिपाइं'ला एक मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. तसेच जागा वाटपात विधान परिषदेची एक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत ‘रिपाइं’ला योग्य वाटा मागितला आहे.

शिवसेनेला केंद्रात मिळणार कॅबिनेट मंत्रिपद?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन किंवा तीन खासदरांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळण्याची शक्याता आहे. एक कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्य मंत्री पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिनेमात रोल देण्याचं आमिष अन् भयानक कृत्य! २० वर्षांच्या तरुणीसोबत घडला हादरवणारा प्रकार; मुंबईतील 'त्या' गायकाचा खरा चेहरा समोर

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Krishna Mahabharata: महाभारतात श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या युद्धात शस्त्र न उचलण्याचा निर्णय का घेतला होता?

Accident : अंत्यविधीला जाताना कार अन् ट्रकची भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू; अपघाताने एका क्षणात सर्व काही संपलं...

Helicopter Crash: उड्डाण घेताच काही मिनिटांत हेलिकॉप्टर कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT