Mahayuti Government Saam
मुंबई/पुणे

Cabinet Expansion : सावंत, सत्तार ते भुजबळ,वळसे पाटील अन् मुनगंटीवार-चव्हाण; ११ दिग्गजांना डच्चू,यादी एका क्लिकवर

Cabinet Expansion Update : फडणवीस सरकारमध्ये यंदा तानाजी सावंत आणि अब्दूल सत्तार यांना शपथविधीसाठी फोन आलेला नाही. फडणवीस सरकारमध्ये यंदा अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू मिळाल्याचं बोललं जात आहे.

Vishal Gangurde

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरु आहे. महायुतीचे सर्व आमदार शपथविधी सोहळा आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोहोचले आहेत. या सोहळ्या महायुतीमधील संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. या यादीत शिंदे सरकारमधीलस बड्या नेत्यांचा पत्ता कट झाल्याचे दिसत आहे. महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांमधील काही नेत्यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये छगन भुजबळ यांच्यापासून तानाजी सावंत यांच्या नावाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला रात्री झालेल्या बैठकीत निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. महायुतीच्या खातेवाटपात भाजपला जवळपास २० मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १३ खाते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १० मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठकीत हा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. भाजपला मिळणाऱ्या खात्याबाबतही सविस्तर चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे. तसेच आतापर्यंत महायुतीच्या ३९ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती मिळाली आहे.

शिंदे गटातील बड्या नेत्यांचा मंत्र्यांच्या यादीतून पत्ता कट

महायुती सरकारच्या मंत्र्यांचा आज शपथविधी होणार आहे. या सोहळ्यासाठी महायुतीकडून अनेक आमदार फोन करण्यात आले आहेत. या सोहळ्यासाठी अनेक आमदार त्यांच्या कुटुंबासहित नागपूरला उपस्थित झाले आहेत. या सोहळ्यादरम्यान महायुतीने मागील सरकारच्या काळात मंत्री राहिलेल्यांना नेत्यांचा पत्ता कट केल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटातील ३ नेत्यांना शपथविधीसाठी फोन आले नाहीत. शिंदे गटातील तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांच्या नावाचा समावेश आहे. या तिन्ही नेत्यांना शपथविधीसाठी फोन न आल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून दिग्गज नेत्यांना फोन आलेला नाही

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना शपथविधीसाठी फोन आलेला नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अजित पवार हे छगन भुजबळ यांची नाराजी कशी दूर करतात, हे पाहावे लागेल. दिलीप वळसे पाटील यांनाही शपथविधीसाठी फोन आलेला नाही. तसेच शिंदे सरकारमध्ये क्रीडा मंत्री राहिलेले संजय बनसोडे यांना शपथविधीसाठी फोन न आल्याने मंत्रिपदापासून दूर राहावे लागणार असल्याचं बोललं जात आहे. धर्मरावबाबा आत्रम यांचा मंत्रिमंडळापासून पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे.

भाजपमधून कोणाला डच्चू?

भाजनेही काही दिग्गज नेत्यांची मंत्रिपदापासून डावललं आहे. यामध्ये विजय कुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे यांच्या नावाचा समावेश आहे. तर रवींद्र चव्हाण यांना भाजपकडून नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. रवींद्र चव्हाण यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. २०२९ मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी देण्याची शक्यता आहे. तर एकट्या भाजपचे २००हून अधिक आमदार निवडून आणण्याचे उद्धिष्ट असणार असल्याची माहिती हाती आली आहे.

कोणत्या नेत्यांना मिळाला डच्चू?

तानाजी सावंत

दीपक केसरकर

अब्दुल सत्तार

सुरेश खाडे

विजयकुमार गावित

छगन भुजबळ (शपथविधीसाठी फोन नाही)

दीलीप वळसे पाटील

संजय बनसोडे (शपथविधीसाठी फोन नाही)

धर्मरावबाबा आत्रम

सुधीर मुनगंटीवार

रवींद्र चव्हाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Skin Care Routine: काय आहे पंतप्रधानाचं Skin Care Routine? हरलीन देओलने प्रश्न विचारताच मोदींचं भन्नाट उत्तर

Actor Death: KGF सुपरस्टारचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; सिनेसृष्टीवर शोककळा

Maharashtra Municipal Corporation Election : महापालिका निवडणुका कधी होणार? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने थेट तारखा सांगितल्या

Stressful Situation : भरपूर ताण येतो अन् डोके दुखते, मग आजपासूनच करा 'या' गोष्टी

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने साथ सोडली, 'घड्याळ' हाती बांधलं

SCROLL FOR NEXT