Maharashtra Cabinet Expansion Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion: भाजपच्या या '४' आमदारांना मंत्रिपद फिक्स

Maharashtra Cabinet Expansion: भाजपच्या चार आमदारांना मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाले. पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याचे बोलले जात आहे. यात भाजपच्या चार आमदारांना मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या या '४' आमदारांना मंत्रिपद मिळणार आहे. यात १२ ते १५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

हे देखील पाहा -

उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होऊ शकतो. शिंदे-फडणवीस सरकारचे १२ ते १५ मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. यात भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील, राधा कृष्ण विखे-पाटील. सुधीर मुनंगटीवार आणि गिरिष महाजन हे मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे. शपथविधी हा साध्या पद्धतीने राजभवनवर होणार आहे, असं बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता घटक पक्षांनीही मंत्रिपदाची मागणी केली आहे. दरम्यान शिवसेना नेते रामदास कदम यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातमीला दुजोरा दिला आहे, दोन दिवसात विस्तार होईल असं त्यांनी म्हटले आहे.

रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. भाजपने मित्रपक्षांचा सन्मान ठेवावा. पुढील दोन तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, यात रासपला मंत्रिपद मिळावे अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसापासून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस बैठक सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT