उल्हासनगर: उल्हासनगर (Ulhasnagar) महापालिकेनं चक्क एका प्रसाधनगृहाच्या भिंतीवर तिरंगा आणि सैनिकांचं चित्र रेखाटलं आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) संताप व्यक्त केला आहे. देशाचा झेंडा आणि सैनिक यांच्या चित्रांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पांढरा रंग देत हे चित्र झाकून टाकले आहे. (Ulhasanagar Political News)
हे देखील पाहा -
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या सर्वत्र उत्साहात साजरा केला जातोय. यानिमित्तानं उल्हासनगर महापालिकेनं शहरातल्या अनेक भागात देशभक्तीपर संदेश देणारी, स्वातंत्र्य सैनिकांची चित्रं रेखाटली आहेत. कॅम्प नं. ४ मधील नेताजी चौकातही महापालिकेनं अशी भित्तिचित्रं रेखाटली. मात्र यादरम्यान चक्क एका सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या भिंतीवर देशाचे सैनिक आणि तिरंगा यांचं चित्र रेखाटण्यात आलं. हा प्रकार समजताच मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार हे पांढऱ्या रंगाचा डबा घेऊन तिथे पोहोचले आणि या चित्रावर पांढरा रंग मारत ते पुसून टाकलं.
अशाप्रकारे एखाद्या प्रसाधनगृहाच्या भिंतीवर तिरंगा आणि सैनिकांचं चित्र रेखाटणं हे अतिशय संतापजनक असून या प्रकाराचा आम्ही निषेध करत असल्याचं मनोज शेलार यांनी यावेळी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.