Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: सोमवारी ओबीसी विधेयक मांडले जाणार, अजित पवारांची सभागृहात माहिती

ओबीसी अरक्षणाबाबत आम्ही बिल तयार करत आहोत. आज संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या बिल आणू, असंही ते म्हणाले.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सोमवारी ओबीसी विधेयक सभागृहात मांडणार, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली. ओबीसी अरक्षणाबाबत आम्ही बिल तयार करत आहोत. आज संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या बिल आणू, असंही ते म्हणाले.

"ओबीसी अरक्षणाबाबत (OBC Reservation) आम्ही बिल तयार करत आहोत. आज संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या बिल आणू. आमच्यावर कोणाचा दबाव नाही, आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही", असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिलं आहे.

"सोमवारी ओबीसी बिल मांडले जाईल. ओबीसी मुद्दा भावनिक झाला आहे. मार्ग निघावा, ही भावना आमची होती. आजच्या कॅबिनेटमध्ये मंजूर करत बिल मांडू. सर्वांनी मंजुरी द्यावी", असंही अजित पवार म्हणाले.

"ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रशासक नेमू, ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत ही भूमिका आमची असेल", असंही ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणच्या मुद्यावरुन परिषदेत विरोधकांची घोषणाबाजी

ओबीसी आरक्षणच्या मुद्यावर परिषदेत विरोधकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. ओबीसी आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचा धिक्कार असो, असे फलक झळकवत विरोधकांनी घोषणाबाजी केली. विधानपरिषदेत विरोधकांचा गोंधळ घातला. त्यानंतर विधान परिषदेचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT