Maharashtra Budget 2024 Announcement Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Budget 2024 Scheme: लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, पिंक रिक्षा; अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून बजेटमधील १० महत्वाच्या घोषणा, VIDEO

10 Important Announcement and Scheme Announce in Maharashtra Budget 2024: अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून बजेटमधील १० महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण, अन्नपूर्ण योजना, पिंक रिक्षा या सारख्या बजेटचा समावेश आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनचा शुक्रवारी दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचं बजेट सादर केलं. महायुती सरकारचं हे शेवटचं बजेट आहे. या बजेटनंंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे साऱ्यांच लक्ष या महायुती सरकारच्या बजेटकडे लागलं होतं. या बजेटमध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या. या बजेटमध्ये लाडकी बहीण, अन्नपूर्ण योजना, पिंक रिक्षा या सारख्या योजनांचा समावेश आहे.

बजेटमधील महत्वाच्या घोषणा

राज्यातील महिलांना १० हजार पिंक रिक्षा देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे.

प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे.

व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना ८ लाख रुपये देण्यात येईल.

कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबीयातील मुलींची १०० टक्के फी भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादकांना ५ हजारांचं हेक्टरी अनुदान देण्यात येईल. ५ हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिलं जाईल.

गाईच्या दुधासाठी ५ रुपयाचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारकडून १ जुलैपासून हे अनुदान दिले जाईल .

वारीला जागतिक वारसा म्हणून घोषित करावा, अशी मागणी युनेस्कोकडे केली आहे. त्यानंतर प्रती ‌दिंडीला २० हजार रुपये देण्यात येणार आहे.

संजय गांधी निराधार योजनेत ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १५०० रुपये मिळणार आहे.

शेतकरी वीज माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत शेती कृषी पंपाचं बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माळशेज घाटात व्हीव्हींग गॅलरी उभारण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : रक्षाबंधनाच्या सुट्टीत भावंडांसोबत फिरायचंय? मुंबईजवळची 'हे' पावसाळी पिकनिक स्पॉट्स ठरतील परफेक्ट

Salman Khan Video : 'बिग बॉस २०' मध्ये मोठा ट्विस्ट; स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकणार सदस्य, सलमान खानने दिला इशारा, म्हणाला- "तथास्तु-टू"

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

Rain Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, मुंबईसह ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

Wakad Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत फिरून यायचंय? वाकडजवळच्या 'या' ठिकाणांचा अनुभन तुम्ही घेतलाच पाहिजे

SCROLL FOR NEXT