sanjay raut, sujit patkar saam tv
मुंबई/पुणे

Sujit Patkar Bail: जम्बो कोविड सेंटर घोटाळा; संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना जामीन मंजूर

Sujit Patkar Granted Bail: संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना किल्ला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात सुजित पाटकर यांना जामीन मंजूर झाला आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. २६ फेब्रुवारी २०२४

Jumbo Covid Centre Scam:

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कोरोना काळातील कथित जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना किल्ला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात सुजित पाटकर यांना जामीन मंजूर झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना काळातील कथित जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळाचे आरोप सुजित पाटकर यांच्यावर होते. अनेकदा छापेमारी आणि चौकशीनंतर ईडीकडून सुजित पाटकर यांना ऑगस्ट २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. आता तब्बल पाच महिन्यानंतर किल्ला कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

कोर्टाकडून सुजित पाटकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १ लाख रुपयांच्या पर्सनल बाँडवर पाटकर यांचा जमीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच पाटकर यांना कोर्टाच्या परवानगीविना देश सोडण्यास मज्जाव केला असून त्यांचा पासपोर्ट कोर्टाकडे सुपूर्द करावा लागणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे जम्बो कोविड सेंटर घोटाळा?

बनावट कागदपत्रांच्या आधारे दहिसर आणि वरळी येथील जंबो कोव्हिड सेंटरच कंत्राट मिळवल्याचा आहे सुजित पाटकर यांच्यावर लावण्यात आला होता. कोविड काळात सुजीत पाटकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर होते. या प्रकरणी ईडीकडून सुजित पाटकर यांची अनेकदा चौकशी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express Mumbai To Solapur: मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा किती आहे तिकीट?

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

राज्यात एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार?

Vande Bharat: मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल, दहावीच्या रिझल्टवरही अपडेट, mahresult.nic.in वर पाहा

SCROLL FOR NEXT