Prasad Lad : जरांगेंवर आम्ही जेसीबीने फुले उधळू, पण त्यांनी नाटक बंद करावं...; प्रसाद लाड यांचा हल्लाबोल

Prasad Lad On Manoj Jarange Patil: समाजाच्या हितासाठी जरांगे पाटील यांनी काम केलं पाहिजे. आम्ही त्यांचे स्वागत करु, जेसीबीने फुले उधळू पण त्यांनी नाटक बंद करावीत, असा सल्ला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना दिला आहे.
Prasad Lad
Prasad LadSaam TV
Published On

Manoj Jarange Patil:

मनोज जरांगे पाटील म्हणजे नटसम्राट. सुरू असलेली नाटकं आता बंद करा. १० टक्क्यांचे आरक्षण कसे टिकेल याकडे लक्ष द्या. समाजाच्या हितासाठी जरांगे पाटील यांनी काम केलं पाहिजे. आम्ही त्यांचे स्वागत करु, जेसीबीने फुले उधळू पण त्यांनी नाटक बंद करावे, असा सल्ला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना दिला आहे.

Prasad Lad
Manoj Jarange : मनोज जरांगेंची स्थिती हार्दिक पटेलसारखी केविलवाणी होईल, भाजप नेते आशिष देशमुखांचं टीकास्त्र

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीवर आक्रमक भूमिका घेत जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. जरांगेंनी केलेल्या आरोपानंतर भाजप नेत्यांनी देखील खरमरीत शब्दांत उत्तरे देण्यास सुरूवात केली आहे. अशात मनोज जरांगे पाटील म्हणजे नटसम्राट. त्यांनी हे नाटक बंद केल्यास आम्ही त्यांचं स्वागत करू, असं म्हणत प्रसाद लाड यांनी जरांगेंवर टीकास्त्र सोडलंय.

मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा ठराव दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाला आहे. मात्र आम्हाला सरकारने दिलेलं हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही, तसेच सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलीये. आपल्या मागणीवर ते ठाम असून सध्या अंतरवली सराटी येथून त्यांनी पुन्हा आंदोलनाला सुरूवात केली आहे.

जरांगेंचे फडणवीसांवरील आरोप पाहता भाजप नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतलीये. अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्जला आणि दंगलीला शरद पवार आणि राजेश टोपे यांनी मदत केली असा खळबळजनक दावा भाजप नेत्यांनी केलाय. अहंकाराचा विनाश होतो. मराठा समाजाने दिलेल्या पाठिंब्याची हवा त्यांच्या डोक्यात गेली आहे. राजेश टोपे यांनी कशी मदत केली यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. योग्य वेळी ते आम्ही देऊ, असा दावा लाड यांनी केलाय.

दानवे किंवा इतर लोकांना माहिती देणारे लोक कमी आहेत. त्यांनी मला बोलवून घ्यावे मी त्यांना माहिती देईल. फडणवीस हे राजकारणातील सोज्वळ आणि मुसद्दी चेहरा आहेत. स्वत:चा बचाव करण्यासाठी जरांगेंचं लोकांची सहानुभूती मिळवण्याचं काम चालू आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना पुढे त्यांनी म्हटलं की, जरांगे पाटील यांची दादागिरी कुणाच्या जिवावर सुरू आहे? यामागे शरद पवार आणि राजेश टोपे हेच आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणजे नटसम्राट. त्यांनी लवकरात लवकर आपलं हे नाटकं बंद करावं, असा इशारा प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

Prasad Lad
Crime News: विकृतीचा कळस! मालाडमध्ये १० वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com