Today's Marathi News Live  Saam tv
मुंबई/पुणे

Today's Marathi News Live : गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात सापडल्या आळ्या, लोखंडी नट

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (28 may 2024) : लोकसभा निवडणूक अपडेट्स, राजकीय घडामोडी, देश-विदेशातील घडामोडी, लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर

Vishal Gangurde

गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात सापडल्या आळ्या, लोखंडी नट

परभणीच्या पाथरी तालुक्यातील बाबूलतार मध्ये गर्भवती महिलांना दिल जाणर पोषण आहारात अळ्या लोखंडी नट निघाल्याने खळबळ माजलीय, गर्भवती महिलेच्या पतीने ज्यावेळेस पोषण आहाराचं पॅकेट उघडलं त्यावेळेस हा प्रकार समोर आलंय.गर्भवती महिलांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार समोर आल्याने संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे .शासनाने ज्या संस्थेला हे पोषण आहार पुरवण्याचे टेंडर दिल आहे त्या संस्थेवर आता कारवाई करण्याची मागणी होतीय..

दिल्लीचे विद्यमान मुख्य सचिव नरेश कुमार यांचा कार्यकाळ ३ महिन्यांनी वाढवला

दिल्लीचे विद्यमान मुख्य सचिव नरेश कुमार यांचा कार्यकाळ ३ महिन्यांनी म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत वाढवला

नरेश कुमार या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार होते, परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी 3 महिन्यांसाठी त्यांना मुदतवाढ दिली

केंद्रीय गृह मंत्रालयाने नरेश कुमार यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली

यापूर्वी नरेश कुमार 30 नोव्हेंबर 2023 रोजी निवृत्त होणार होते, मात्र केंद्र सरकारने त्यांची सेवा ६ महिन्यांनी वाढवली होती

तेंव्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होत मात्र कोर्टानेही केंद्र सरकारला ६ महिने सेवा वाढवण्याची परवानगी दिली होती

SIT च्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्या चौकशीवर जनतेचा विश्वास नसल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप

पुणे ‘हिट अँड रन‘ प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या SIT च्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्या चौकशीवर जनतेचा विश्वास नाही. या पूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे ही महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशभरात 63.37 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी देशभरात 63.37 टक्के मतदान

निवडणूक आयोगाकडून आज अधिकृत टक्केवारी जाहीर

सहव्या टप्प्यात महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त, देशभरात साहव्या टप्प्यासाठी 64.95 टक्के महिलांनी बजावला मतदानाचा अधिकार

मतदानानंतर तीन दिवसांनी आयोगाकडून टक्केवारी जाहीर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला भाविकांसह पर्यटकांची तुफान गर्दी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला भाविकांसह पर्यटकांची तुंबळ गर्दी

उन्हाळी सुट्टयांमुळे देवदर्शन आणि वर्षाविहारासाठी आलेल्या भाविकांसह पर्यटक भिमाशंकरला गर्दी

भिमाशंकर मंचर मार्गावर वाहनांच्या चार ते पाच किलीमीटर पर्यत रांगा..

भिमाशंकर परिसरात भाविकांचे वाहतुककोंडीमुळे हाल..

भिमाशंकर परिसरातील चारही पार्किंग फुल होऊन रस्त्यावर वाहनांची पार्किंग

भिमाशंकर मार्गावरील नागमोडी वळणं बेशिस्त वाहतुकीमुळे झालेल्या वाहतुककोंडीत भाविकांनी पायी चालणं पसंद केलंय

वाहतुककोंडी सोडविण्यासाठी पोलीसांची दमछाक..

महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची आज बैठक, लोकसभा निवडणुकीचा घेणार आढावा

महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची आज बैठक

आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार बैठक

बैठकीला कोअर कमिटीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा बैठकीत आढावा घेणार

भाजप आणि मित्रपक्षांची राज्यात काय निवडणुकीत काय परिस्थिती होती यावरही होणार चर्चा

मंत्री छगन भुजबळ यांनी काल केलेल्या वक्तव्यावर भाजपचे अनेक नेते नाराज, त्यावर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

बैठक ऑनलाईन होणार असल्याची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात

उद्यापासून फडणवीस वाराणसी दौऱ्यावर

1 जूनला वाराणसीत मतदान होणार आहे त्यासाठी फडणवीस वाराणसीत

काही सभांसोबतच फडणवीस रोड शो करण्याची देखील शक्यता

ससून रुग्णालय चौकशी समितीचे गेल्या ७ तासांपासून कामकाज सुरू

ससून रुग्णालय चौकशी समितीचे गेल्या ७ तासांपासून कामकाज सुरू

ससून रुग्णालय डिन डॉ विनायक काळे यांच्या केबिनमध्ये सुरू आहे समितीचे कामकाज

समितीकडून ससून रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ब्लड लॅबच्या कर्मचाऱ्यांची करण्यात आली चौकशी

समितीच्या अध्यक्षा डॉ पल्लवी सापळे यांच्यासह इतर दोन सदस्यांनी केली चौकशी

समितीने केली ब्लड लॅबची केली पाहणी

डोंबिवलीतील केमिकल कंपन्या जांबिवली सारख्या जागांवर शिफ्ट करू

केमिकल जांबिवली सारख्या जागांवर शिफ्ट करू.

ती कंपनी ज्यात ब्लास्ट झाला ... त्यात रसायन आणले त्याला परवानगी मिलेली होती का हे पाहायला जाईल.

अनेक गोष्टी पत्रकार परिषदेत नाही बोलू शकत.

काही अजून केमिकल कंपनी आहेत त्याचा रिअँक्शन त्रास होत नाही.

नाहक त्रास देण्याचा उद्देश नाही.

MIDC ब्लास्ट प्रकरणी रहिवासी यांचं ऐकून घेतलं

रहिवासी यांना बाहेर काढणे महत्त्वाचे आहे.

बफर झोनमध्ये नियम कोणी पाळले नाही यावर चौकशी लावू.

पुणे हिट अॅण्ड रन प्रकरण; अल्पवयीन मुलाच्या मित्राचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

अल्पवयीन मुलाचा मित्र याचा जबाब पुणे पोलीस सध्या नोंदवत आहेत

अल्पवयीन मुलाबरोबर त्याच्या गाडीत असणाऱ्या मित्राचा जबाब त्याच्या आई समोर नोंदवला जात आहे

पार्टीच्या दिवशी काय झालं अपघात कसा घडला याची चौकशी केली जात आहे

त्याच्या जबाबातून अनेक खुलासे समोर येणार

उरण तालुक्यातील कोप्रोली चौकात सॅन्डविचच्या दुकानाला आग

उरण तालुक्यातील कोप्रोली चौकात सॅन्डविचच्या दुकानाला लागली आग.

शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती.

आगीमुळे एका सिलेंडरचा देखील झाला स्फोट.

आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक.

अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.

सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही.

गुजरातहून मुंबईकडे येणारी मालगाडी घसरली

पालघर - पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे डबे घसरले . गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर मालगाडीचे डबे घसरले . पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्स्प्रेस वर परिणाम होणार .

विशाल अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या मुस्ताक मोमीनच्या तक्रारीची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे

सुरेंद्र अग्रवाल व विशाल अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या मुस्ताक मोमीनच्या तक्रारीची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारयाकडे

वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार मोमीनच्या तक्रारीची चौकशी

मोमीन यांनी दिले वरिष्ठ अधिकाऱ्याला सर्व पुरावे

सुरेंद्र अगरवाल व विशाल अग्रवाल याच्यावर अजून एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता

मुस्ताक मोमीन याला अगरवाल याने छोट्या राजांच्या नावाने दिली होती धमकी

मोमीन करणार सुरेंद्र अगरवालाच्या संपत्तीच्या चौकशीची ईडीकडे मागणी

मुंबई भाजप कोर कमिटीची बैठक, पदवीधर मतदारसंघाबाबत चर्चा

मुंबई भाजप कोर कमिटीची बैठक

मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाबाबत बैठकीत चर्चा

दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात बैठकीला सुरुवात

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबई भाजपचे कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली

सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची समोरासमोर होणार चौकशी

पोलीस कोठडी मिळाल्यानंतर सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले आहे...

गुन्हे शाखेकडून आता दोघांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे....

हिट अँड रन प्रकरणात चालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल आहेत...

माजी महापौरांवर गोळीबार प्रकरणातील दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिकच्या मालेगाव मधील माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडल्या नंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या २४ तासाच्या आत दोघा आरोपींना ताब्यात घेत त्यांना अटक केली.दुपारी त्यांना मालेगावच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले असतां न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुण्यात ट्रक ने महाविद्यालयीन तरुणांना चिरडले,  दोघांचा मृत्यू

पुण्यातील खराडी बाय पास जवळ घडली घटना

काल रात्री १०.३० वाजता हा अपघात घडला

हे दोन महाविद्यालयीन युवक मूळचे लातूरचे असून ते सध्या वाघोली येथे शिक्षण घेत होते

मालवाहतूक ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने येत होता यावेळी खराडीतील जकात नाका चौकात हा अपघात घडला

श्यामबाबू रामफळ गौतम असे चालकाचे नाव असून

त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

भरत गोगावले आणि विकास गोगावले यांच्या आडचणीत वाढ

भरत गोगावले आणि विकास गोगावले यांच्या आडचणीत वाढ

विकास गोगावले गोळीबार प्रकरणी ॲड. असिम सरोदे यांनी घेतले फिर्यादी पक्षाचे वकील पत्र

गोगावले प्रकरणावरून ॲड सरोदे यांचा सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल

सत्तास्थानी आहेत त्यांनी पोलिसांना हाताशी धरून इतरांना आरोपी करायच हे योग्य नाही

विरोधक आणि विरोधीमत संपवुन टाकायचे हे योग्य नाही

गोगावले प्रकरणी ॲड सरोदे यांनी पोलिसांवर केले पक्षपातीपणे तपास केल्याचे आरोप

आ. भरत गोगावले यांनी धमकावल्याचे वाक्य ऐकू येत आहेत, त्या प्रकरणी आवाजाची तपासणी करण्याची सरोदे यांची न्यायालयाकडे मागणी

अग्रवाल पिता पुत्रांना दिलासा नाहीच, ४ दिवस पोलीस कोठडी

दुर्देवी अपघात आहे. मला सकाळी कळले. मी डायवरला घेऊन गेलो. त्याच्याशी दोन मिनीटे बोलणे झाले. त्यानंतर मी त्याला त्याच्या कुंटुंबाला फोन करायला सांगितले.

आम्ही प्रतिष्ठीत फॅमिली आहोत मी हे प्रेशर सहन नाही करु शकत

दोघांना ३१ तारखेपंर्यत पोलीस कोठडी

४ दिवस पोलीस कोठडी

अग्रवाल पिता पुत्रांना दिलासा नाहीच. चार दिवस पोलीस कोठडी. दोघांची एकत्रीत चौकशी होणार. डायवर अपहरण प्रकरण

नागपुरातही हिट अँड रनचा प्रकार उघडकीस, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना नागपुरातही हिट अँड रनचा प्रकार उघडकीस

नागपूरात हिट अँड रनमुळे एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

बालाजी नगर परिसरात 22 मे रोजी सकाळी 8 वाजता मागून बेदारक पणे येऊन जेष्ठ नागरिकाला उडविले

ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून 40 फूट पर्यंत कार ने वृद्धाला फरफटत नेले

अपघातात जेष्ठ नागरिकच घटनास्थळीच मृत्यू

अर्नाळा समुद्रात बोट पलटली; ११ जण सुखरूप एकाचा मृत्यू

विरारच्या अर्नाळा समुद्रात मोठी बोट दुर्घटना घडली आहे. अर्नाळा किल्ल्यातील घराच्या दुरुस्तीसाठी खडी व विटा वाहून नेणारी बोट पलटली आहे. या बोटीत एकूण १२ जण होते.. त्यातील ११ जण सुरक्षित असून एकाचा मृत्यु झाला आहे. संतोष मुकने असं या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

2018 मधील किर्ती व्यास हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

सिद्धेश ताम्हणकर आणि त्याची मैत्रीण खुशी सजवानी दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा सिद्ध झाला. मुंबई सत्र न्यायालयाचे विषेश न्यायाधीश पी.एम. देशपांडे यांनी निकाल दिलाय.  किर्ती व्यास हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.

Aditya Thackeray: कोस्टल रोड गळतीवरून आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

मविआचे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णपणे तयार झालेला असता आणि नागरिकांसाठी खुला झाला असता. पण, भ्रष्ट राजवटीने आमचं सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचं काम केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडच्या गळतीची पाहणी करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मुंबई कोस्टल रोडच्या गळतीची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.

Pune Porsche Accident Case : ससून रुग्णालयातील आपत्कालीन कक्षाची पाहणी

पोर्शे कार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला ससूनच्या याच कक्षात आणलं. मेडिकल चेकअपची प्रोसिजर फॉलो करताना त्या मुलाची नोंदणी ज्या रजिस्टरमध्ये केली होती. त्यांच्या नोंदी चौकशी पथकाने घेतल्या. सोबतच ज्या बेडवर झोपवून त्याचे रक्ताचे नमुने घेतले. त्या बेडची,कक्षाची आणि तिथल्या सीसीटीव्हीची ही पाहणी पथकाने केली.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी दौऱ्यावर

30 मे रोजी पंतप्रधान मोदी कन्याकुमारीला जाण्याची शक्यता आहे. विवेकानंद रॉक मेमोरियलवर पंतप्रधान मोदी ध्यानाला बसणार आहेत. 1 जून रोजी देशातील शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा असतानाच पंतप्रधान मोदी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा जागर करणार

Akola Accident: अकोल्यात भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अकोल्यात दुचाकीस्वाराचा अपघातात जागीच मृत्यू झालाय. दुचाकी स्वार ओव्हरटेक करायच्या नादात जीवनीशी गेलाय. अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील नव्या किराणा बाजार जवळ दुचाकीस्वार बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय.

Raigadh Lok Sabha: निकालापूर्वीच रायगडमध्ये झळकले अनंत गीते यांच्या विजयाचे बॅनर

निकालापूर्वीच रायगडमध्ये अनंत गीते यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. बॅनरवर अनंत गीते यांचाभावी केंद्रीय मंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे. माणगाव तालुक्यात गोरेगाव बस स्थानक परिसरात बॅनर लागलेत.

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : इन्स्टाग्रामवर रॅप साँग तयार करणारा चौकशीला गैरहजर

कल्याणीनगर अपघात प्रकरणी इन्स्टाग्रामवर रॅप सॉंग तयार करणारा तरुण चौकशीला गैरहजर राहिला आहे.

पोलिसांनी या तरुणाला चौकशीला हजर राहण्यासाठी आणखी एक नोटीस पाठवली आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने त्याला नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढणार? उमेदवारीसाठी रमेश कीर यांच्या नावाची चर्चा

महाविकास आघाडीत कोकण पदवीधरची निवडणुक काँग्रेस लढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील दोन जागा ठाकरे गट लढणार आहे. तर कोकण पदवीधर काँग्रेस लढणार आहे.

काँग्रेसकडून रमेश कीर यांच्या नावाची चर्चा आहे.

आमदार धंगेकरांनी घेतली ससून अधिकाऱ्यांची भेट, केली कारवाईची मागणी

आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी धंगेकरांनी कडक कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात ससून जबाबदार आहे. चौकशी समिती योग्य तपास करावा. हसन मुश्रीफ यांनी यात योग्य लक्ष घालून कारवाई केली तर त्यांना दंडवत घालीन, असे धंगेकर म्हणाले.

Amaravati News : अमरावतीत हिरव्या वांग्यांना कवडीमोल भाव

अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरव्या वांग्यांना कवडीमोल भाव मिळत आहे. एक ते दिड रुपये किलोमध्येही वांग्याची खरेदी करायला ग्राहक फिरकेना. वांग्याची आवक वाढल्याने दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना झाला आहे. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल वांगी विक्री विना पडून आहेत. यामुळे वांगी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

पुणे विद्यापीठात गांजा सापडल्याचा आरोप, सुषमा अंधारे कुलगुरुंच्या भेटीला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गांजा सापडल्याचा आरोप आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे विद्यापीठात दाखल आहेत.

पुणे विद्यापीठातील कुलगुरू यांची सुषमा अंधारे या त्यांच्या कार्यालयात भेट घेत आहेत.

पुणे हिट अँड रन प्रकरण : ससून रुग्णालयातील कर्मचारी चौकशीच्या भीतीपोटी पळाला

ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी चौकशीच्या भीतीपोटी पळून गेला आहे. पुणे पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधात आहे. आपल्याला ताब्यात घेतील या भीतीने हा कर्मचारी पळून गेल्याची माहिती मिळत आहे. या कर्मचाऱ्याने डॅाक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हार्रनोळ याला मदत केली होती. आज त्याला पुणे पोलीस अटक करण्याची शक्यता आहे.

Pune car accident : पब मालकासह चौघांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

पुणे

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण

पब मालक आणि मॅनेजर प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, जयेश गावकर यांच्या जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी

पुणे सत्र न्यायालयात आरोपींच्या वकिलाने केलाय जामिनासाठी अर्ज

सध्या हे चारही जण न्यायालयीन कोठडीत

अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी चौघांनाही केलीय अटक

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेनेकडून शिवाजी शेंडगे इच्छुक

मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे इच्छुक

शिवाजी शेंडगे स्वतः शिक्षक असून शिक्षक सेनेचे राज्य समन्वयक देखील आहेत.

आमदार प्रकाश सुर्वे यांचे अतिशय जवळचे सहकारी

2018 साली मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेकडून त्यांनी लढवली होती

CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा झटका, जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणीस नकार

नवी दिल्ली -

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा पुन्हा झटका

सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन बेंचचा जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी सरन्यायाधीशांकडे जाण्याचा दिला सल्ला

यावर सुनावणी सरन्यायाधीशच घेतील - न्यायमूर्ती माहेश्वरी

तात्काळ सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

अरविंद केजरीवाल यांना २ तारखेला पुन्हा तिहार जेलमध्ये जावे लागणार

Pune : डॉ. सापळेंच्या अध्यक्षतेखालील समिती आज ससूनमध्ये, ब्लड सॅम्पल फेरफार केल्याचा आरोप

पुणे

डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने नेमलेली समिती आज ससूनमध्ये येणार

चौकशी समितीमध्ये तीन सदस्य आहेत

ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी सरकारने ससून हॉस्पिटलची चौकशी करण्यासाठी समिती नेमलीय

ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांनी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचा आरोप, दोन्ही डॉक्टर अटकेत

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण : धंगेकर घेणार ससून हॉस्पिटलच्या डीनची भेट

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण : आमदार रवींद्र धंगेकर ससून हॉस्पिटलमध्ये डीनला भेटणार आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टर अटकेत आहेत. त्या डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. ससून डीनला याबाबत धंगेकर ११ वाजता भेटणार आहेत.

डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या मार्फत; मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा

डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती ही वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या मार्फत झाली आहे. डॉ. पल्लवी सापळे यांची पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणाच्या एसआयटी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप नाही, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

teacher recruitment : राज्यातील शिक्षक भरतीला पुन्हा ब्रेक

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे आता शालेय शिक्षण विभागाच्या वतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीला पुन्हा ब्रेक लागलाय.

Nashik News : नाशिकमधील दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आढावा बैठक घेणार

नाशिकमध्ये दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आज आढावा बैठक घेणार आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ धरणं कोरडीठाक तर ९ धरणांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा १६ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

Political News : विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक, नावांची घोषणा होणार?

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी महायुतीच्या प्रमुख नेत्याची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दोन दिवसात चार जागांवर नावाची घोषणा करणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आता मनसेला मदत करणार का? तीन पक्ष एकत्र लढणार हे देखील पाहणं गरजेचं आहे.

loksabha Election : लोकसभेच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप संघटनात्मक मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभेसाठी विस्तारक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र ज्या पद्धतीने लोकसभेत काम व्हायला पाहिजे होते, त्या पद्धतीने काम झालं नाही, अशा पद्धतीचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे भाजप ज्यांनी काम केले नाही, त्यांना लवकरच घरचा रस्ता दाखवणार आहे.

chhatrapati sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar :  राजकीय नेत्याच्या गाडीने दोघांना उडविले; पिता-पुत्र गंभीर जखमी.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात डाकेफळ रस्त्यावर भाजपचे उपजिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या वाहनाची दुचाकीला धडक

अपघातात पिता-पुत्र गंभीर जखमी

मुलासोबत लग्नासाठी जात असताना हा अपघात

दुचाकीला उडविल्यानंतर पुढे पळून जाताना कारचे टायर फुटले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SCROLL FOR NEXT