Maharashtra Board Result Saam tv
मुंबई/पुणे

बारावीत अनुत्तीर्ण झालात? काळजी नको! पुरवणी परीक्षेसाठी आजपासून भरा फॉर्म; 'असं' आहे वेळापत्रक

HSC supplementary exam : बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र बोर्डाने पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्जाची तारीख, पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Maharashtra board HSC supplementary exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालापाठोपाठ आता पुरवणी परीक्षेची तयारी सुरू केली आहे. जून-जुलैमध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी आजपासून (मंगळवार, ५ मे) विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. राज्यातील परीक्षा केंद्रावर होणाऱ्या कॉपीचा प्रकार टाळल्यामुळे यंदा राज्याचा निकाल कमी लागल्याचे बोर्डाने स्पष्ट करण्यात आले होते.

फेब्रुवारी-मार्च २०२६ यादरम्यान झालेल्या बारावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अथवा ज्यांना कमी गुण मिळाल्यामुळे श्रेणीसुधार (Class Improvement) करायचा आहे, अशा सर्वांसाठी पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी आहे. त्यासाठी आजपासूनच अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अनुत्तीर्ण आणि पुन्हा परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.

या विद्यार्थ्यांना भरता येईल अर्ज :

  • मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी.

  • श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे विद्यार्थी.

  • खासगी विद्यार्थी (१७ नंबरचा फॉर्म भरलेले).

  • आयटीआय (ITI) किंवा तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी.

महत्त्वाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

  • नियमित शुल्कासह अर्ज: ५ मे ते १५ मे २०२६

  • विलंब शुल्कासह अर्ज: १६ मे ते २० मे २०२६

  • महाविद्यालयांनी शुल्क जमा करण्याची मुदत: २१ मे पर्यंत

  • विभागीय मंडळाकडे याद्या सादर करणे: २५ मे पर्यंत

नियमित आणि विलंब शुल्कासाठी दिलेल्या मुदतीत कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अतिविलंब शुल्काबाबतचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात दहीहंडी उत्सवाला एकनाथ शिंदेंची उपस्थिती

Maharashtra Politics: शरद पवारांच्या जवळच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, 'ते' वक्तव्य भोवलं; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? त्या बॅनरने राज्यात घडामोडींना वेग

Government Jobs: खूशखबर! वयाची तिशी ओलांडल्यानंतरही मिळेल सरकारी नोकरी; कुठे -कुठे आहे संधी जाणून घ्या

Motha Mangalsutra Design: सणासुदीला आणि लग्नसमारंभात खुलून दिसेल लूक; पाहा 'या' ७ ट्रेंडी मंगळसूत्रांच्या डिझाइन्स

SCROLL FOR NEXT