Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

BMC News : सिंगल-यूज प्लास्टिकवर १००% बंदी, नियम तोडणाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई, मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

Mumbai News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि मुंबई महानगरपालिकेने सिंगल-यूज प्लास्टिकवर पूर्ण बंदी घालत कारवाई मोहीम सुरू केली आहे. भारत रिसायकलिंग शो २०२५ मध्ये सिद्धेश कदम यांनी “जय शिवा” उपक्रमाद्वारे रोजगारनिर्मिती आणि प्लास्टिकमुक्त महाराष्ट्राचे ध्येय व्यक्त केले.

Alisha Khedekar

एमपीसीबी आणि मुंबई महानगरपालिकेची सिंगल-यूज प्लास्टिकवर संयुक्त कारवाई मोहीम सुरू

“भारत रिसायकलिंग शो २०२५” मध्ये प्लास्टिकमुक्त महाराष्ट्राचे संकल्प व रोजगारनिर्मितीवर भर

सिंगल-यूज प्लास्टिक उत्पादन आढळल्यास युनिट कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा

“जय शिवा” उपक्रमांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात रोजगार निर्मितीचे नवे अवसर

संजय गडदे, मुंबई

सिंगल-यूज प्लास्टिकच्या वापरावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि मुंबई महानगरपालिकेने संयुक्तपणे नियंत्रण आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मागील महिन्यात महानगरपालिकेसोबत झालेल्या बैठकीत प्रदूषण नियंत्रणासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. “मुंबईची एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) नियंत्रित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कदम हे गोरेगाव येथील नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलेल्या भारत रिसायकलिंग आणि प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

मीडिया फ्युजन आणि क्रेन कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने भारत रिसायकलिंग शो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. याचसोबत प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया ची दुसरी आवृत्ती देखील सुरू झाली आहे. हा कार्यक्रम देशातील सर्वात मोठा आणि सर्वांत व्यापक रिसायकलिंग-केंद्रित कार्यक्रम ठरला आहे. तीन दिवसीय या महत्त्वाकांक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सिद्धेश कदम यांनी असे प्रदर्शन फक्त मुंबईतच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्व शहरांमध्ये आयोजित करणे गरजेचे आहे ज्याच्यामुळे देशातील शेतकरी तरुण वर्ग आणि लाडक्या बहिणींना देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे सिद्धेश कदम यावेळी बोलताना म्हणाले.

भारत रिसायकलिंग शो मध्ये धातू, ई-कचरा, बॅटरी, टायर, जुनी वाहने, कागद आणि बांधकाम कचरा यांसारख्या वस्तूंच्या रिसायकलिंगसाठी भारतातील पहिला समर्पित व्यापार शो ठरला आहे. त्याचबरोबर होणारा प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया विशेषत वेगाने विकसित होत असलेल्या प्लास्टिक रिसायकलिंग उद्योगावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कदम यांनी यावेळी म्हटले आहे.

कदम यांनी पुढे स्पष्ट केले की, सिंगल-यूज प्लास्टिक महाराष्ट्रात १०० टक्के बंद आहे. कुठेही प्लास्टिकचे उत्पादन किंवा वापर आढळल्यास संबंधित युनिट ताबडतोब कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. “दंड वसूल करणे हा हेतू नाही; नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक वापर टाळायला हवे,” असे त्यांनी म्हटले.

एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बाजारात जाताना कापडी पिशव्या वापराव्यात आणि प्लास्टिक पिशवी देणाऱ्या विक्रेत्यांकडून ती न घेता योग्य उदाहरण घालावे. २००६ च्या महापुरावेळी प्लास्टिकमुळे ड्रेनेज ब्लॉक होऊन मिठी नदीची अवस्था बिकट झाली होती, हे लक्षात घेऊन मिठी पुनर्जीवनासाठीही मंडळ कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच, “जय शिवा” उपक्रमांतर्गत प्लास्टिक रिसायकलिंगद्वारे नव्या वस्तू तयार करून शेतकरी, तरुण आणि महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही कदम यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

Moisturizer For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणता मॉइश्चरायझर आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT