maharashtra assembly speaker rahul narvekar slams uddhav thackeray group on shivsena mla disqualification hearing  Saam TV
मुंबई/पुणे

Rahul Narwekar News: तुमच्या गिधड धमक्यांना मी घाबरत नाही; राहुल नार्वेकरांनी विरोधकांना ठणकावलं

Rahul Narwekar Latest News: राहुल नार्वेकर हे जाणून बुजून यावर सुनावणी घेण्यास तसेच निकाल देण्यास वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार केला जात आहे.

Satish Daud

Rahul Narwekar Latest News

शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. राहुल नार्वेकर हे जाणून बुजून यावर सुनावणी घेण्यास तसेच निकाल देण्यास वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार केला जात आहे. यावर बोलताना आज राहुल नार्वेकरांनी विरोधकांना चांगलंच ठणकावलं आहे.  (Latest Marathi News)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं. अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी कायदा, नियम व संविधानातील तरतुदींनुसारच निर्णय घेणार, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

'मी नियमानुसारच काम करणार'

तसेच कुणी कितीही मला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, कोणतेही आरोप केले तरी मी नियमानुसारच काम करणार, असंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पण लक्षात ठेवा मी तुमच्या गिधड धमक्यांना घाबरत नाही, असं देखील राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.

'...म्हणून मी विदेश दौरा रद्द केला'

राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या सुनावणीचं वेळापत्रक काढल्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर नार्वेकरांनी तातडीने आपला घाना देशाचा दौरा रद्द केला. यावरुन राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या. यावर बोलतानाही राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं.

मी माझा विदेश दौरा २६ तारखेलाच रद्द केला होता. त्याबाबत सीपीएला कळवलं होतं की इकडे काही पुर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी कॉन्फ्रससाठी उपस्थित राहू शकणार नाही. पण २८ तारखेला त्या दौऱ्याविषयी चर्चा करून आपण तो दौरा रद्द करायला लावल्याचं चित्र निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT