Maharashtra Monsoon Session : Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Monsoon Session : मुंबई बिल्डरच्या घशात घातली जातेय; पावसाळी अधिवेशनात विरोधकांचे आरोप, सत्ताधाऱ्यांचं उत्तर

Maharashtra Monsoon Session update : मुंबई बिल्डरच्या घशात घातली जातेय,असा गंभीर आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. विरोधकांनी केलेल्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी दिले.

Vishal Gangurde

सुनील काळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधीमंडळात सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुंबईतील जमिनीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबईतील जमिनी उद्योजक गौतम अदानी यांच्या घशात घातल्या जात आहेत, असा आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केला. विरोधकांच्या आरोपानंतर सत्ताधाऱ्यांनी आरोप फेटाळून लावले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील जमिनींवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.

महाराष्ट्राच्या विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवसही आंदोलन आणि आरोप-प्रत्यारोपाने गाजत आहे. आज गुरुवारी गुरुवारी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात आंदोलन केलं. रामकृष्ण हरी आणि शेतकरी फिरतोय, अशा आशयाच्या घोषणाबाजी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केल्या. त्यानंतर अधिवेशनातही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरून घेरलं.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, 'मुंबई बिल्डरच्या घशात घातली जात आहे. कुर्ल्याची दुग्धविकास खात्याची जागा अदानींना दिली जात आहे. ही एकूण ८.५ हेक्टर जागा आहे. ही जमीन गौतम अदानींच्या घशात घातली जात आहे. जमिनीची मूळ किंमत २० कोटींची आहे. महाराष्ट्राला फसवलं जात आहे. त्याला विरोध केल्यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली केली. मुंबईला वाचवा. राज्याचे प्रमुखच त्यांना पाठिशी घालत आहेत. याची चौकशी करण्याची गरज आहे. अध्यक्ष तुम्ही आदेश द्या'.

नाना पटोले काय म्हणाले?

अधिवेशनात नाना पटोले म्हणाले की, 'मुंबईतील पवईतील जय भीमनगरमधील झोपडपट्टीवासीयांबाबत आदेश दिले होते. तुमच्या आदेशाला काही किंमत आहे की नाही? ज्या लोकांची घरे तोडली होती. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था काय केली, याचा अहवाल उद्यापर्यंत द्यावा'.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आदित्य ठाकरे म्हणाले, 'शिंदे सरकारच्या मालकाच्या घशात जमिनी घातल्या जात आहेत . मुंबईत कुणालाही टीडीआर घ्यायचा असेल, तर 40 टक्के अदानी समुहाला दिले जातात. आज धारावीत अदानी म्हणतील, तेच खरं आहे, असा कायदा राज्यात करत आहेत. ज्या जमिनी दिल्या जात आहेत, ते किती वर्ष तुम्ही अदानी समुहाला देणार आहात. आमची मागणी आहे की, जीआर रद्द करावा आणि मुंबईचे जीआर आणावे'.

'सायन रुग्णालयात गेल्या वर्षी १ लाख आयव्ही बॉटल डोनेशनद्वारे घेतल्या गेल्या का? डीनवर कारवाई नको. तर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT