VIDEO: 'ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा', विधानसभेत जोरदार घमासान; विजय वडेट्टीवार, रविंद्र धंगेकरांनी सरकारला घेरलं!

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Live Updates: राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार रविंद्र धंगेकर यांनी ससूनमधील भ्रष्टाचारावरुन राज्य सरकारला धारेवर धरले.
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Live Updates:
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Live Updates: Saamtv

सुनिल काळे| मुंबई, ता. ४ जुलै २०२४

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. आधी ललित पाटील आणि आता पोर्शे अपघातानंतर ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार रविंद्र धंगेकर यांनी ससूनमधील भ्रष्टाचारावरुन राज्य सरकारला धारेवर धरले.

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Live Updates:
Pune News: अरविंद शिंदेंना 'ते' वक्तव्य भोवणार? पुण्यात भाजप- काँग्रेस पक्ष आमने-सामने!

विजय वडेट्टीवार आक्रमक

"ससून रुग्णालय हे गुन्हेगार,ड्र्ग्ज माफियांसाठी फाईव्ह स्टार अड्डा करणार आहात का? तिथं रक्ताचे नमूने बदलले जातात. तिथं गुन्हे ‌करण्यासाठी फाईव्ह स्टार करणार आहात का?" असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

रविंद्र धंगेकरही संतापले

तसेच "मी ससूनमध्ये आठवड्यातून दोनदा जातो. माझा ससूनचा रोज संबंध आहे. ससून हा गुन्हेगारीचा अड्डा झाला. मागच्या वेळी डॉक्टर पैसे घेतानाचा व्हिडीओ आला होता. दोषींना बढती का ‌देता, त्यांच्यावर काय कारवाई करणार?" असा सवाल करत काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनीही यावरुन विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली.

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Live Updates:
Sunil Kedar News: काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का! जिल्हा बँक घोटाळ्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

दरम्यान, विरोधकांच्या या आरोपांवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले. काही घटनांमुळं ससून बदनाम झालं. पण आता कठोर कारवाई केली जाईल. सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन ससूनला भेट देऊ आणि सुधारणा करु, असे उत्तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Live Updates:
Maharashtra Politics: ब्रेकिंग! वसंत मोरे वंचितची साथ सोडून 'शिवबंधन' बांधणार, आज मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेणार; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com