MNS , Raj Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Navnirman Sena: मनसेकडून विधानसभेची तयारी सुरू, महायुतीकडे करणार २० जागांची मागणी?

Maharashtra Assembly Election 2024: मनसेची १३ जून रोजी महत्वाची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. मनसेने महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील २० जागांची मागणी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Priya More

वैदेही काणेकर, मुंबई

लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) झाल्यानंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election 2024) तयारीला लागले आहेत. आता विधानसभा निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. यासंदर्भात मनसेची (MNS) १३ जून रोजी महत्वाची बैठक होणार आहे. अशामध्ये मनसे महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील २० जागांची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी मुंबईमध्ये मनसेची महत्वाची बैठक होणार आहे. त्याचप्रमाणे कार्यकारणी निवडणूक देखील याच दिवशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता राज ठाकरे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत.

राज ठाकरे विधानसभेसाठी महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील २० जागांची मागणी करत असल्याची माहिती आहे. मुंबईतील मराठी नागरिक राहत असलेले परिसर म्हणजेच दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, कल्याण, ठाणे, चेंबूर, भिवंडी, नाशिक, पुणे या जागांची मनसे चाचपणी करत आहे. ४ दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभेसाठी मनसेचे काही संभाव्य इच्छुक उमेदवार -

- दादर - माजी आमदार नितीन सरदेसाई

- वर्सोवा - मनसे नेत्या शालिनी ठाकरे

- वरळी - संदीप देशपांडे

- शिवडी / नाशिक - बाळा नांदगावकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT