Kalyan News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : ऐन निवडणुकीत सापडलं ५ कोटींचं घबाड; कोट्यवधींची रोकड पाहून अधिकाऱ्यांना बसला धक्का

Kalyan News :ऐन निवडणुकीत सापडलं ५ कोटींचं घबाड सापडलं आहे. कल्याणमध्ये कोट्यवधींची रोकड सापडल्याने अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. विधानसभा मतदासंघातील उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील ड्युटीवर आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदारसंघातील घडामोडी आणि पैशांच्या देवाणघेवाणी चांगलंच लक्ष्य आहे. याचदरम्यान, आयकर विभागाने कल्याणमध्ये ५ कोटींची रोकड ताब्यात घेतली आहे.

कल्याण शीळ फाटा रोडवर कोट्यवधींची रोकड पकडण्यात आली आहे. या रोडवर पाच कोटींहून अधिक रक्कम असल्याची माहिती मिळाली आहे. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या वाहनात रोकड आढळली आहे. रोकडबाबत माहिती पुरावे देऊ न शकल्याने भरारी पथकाने रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात दिली. ऐन विधानसभा निवडणुकीत कोट्यवधींची रोकड सापडल्याने मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना मोठे घबाड सापडले आहे. पंधरवड्यात छत्रपती संभाजीनगर,जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. राज्यातील २१ विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी, चेकिंग दरम्यान मोठी कारवाई केली आहे.

पंधरवड्यात विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या नाकाबंदी आणि वाहन तपासणीदरम्यान आतापर्यंत ५ कोटी रोख रक्कम आणि जवळपास १० कोटी रुपये किंमतीचे सोने-चांदी सापडले आहेत. अवैध दारू विक्री- वाहतूक करणाऱ्या विरोधात दीड हजार गुन्हे दाखल करून 2 लाख 65 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय जवळपास दोन कोटी रुपयाचा मुद्देमाल गुन्हेगाराकडून जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

गुटखा बंदी असतानाही गुटखा विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर 84 गुन्हे दाखल करून जवळपास 13 हजार किलो गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यासोबत दोन कोटी किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ आणि गांजा आणि नशेचे पदार्थ विक्री करणारे 42 गुन्हे दाखल करून 28 क्विंटल अमली पदार्थ जप्त करण्यात आली आहे. एकूण तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Tax : खराब रस्त्यांवर टोल वसुली नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Rain Live News : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT