Election Commission: हरियाणा निवडणुकीत गडबड झाली? काँग्रेसच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर, १६०० पानी पत्रात काय म्हटलं, जाणून घ्या

Election Commission: हरियाणा निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसला निवडणूक आयोगाने फटकारलंय. तुमच्या बेजबाबदार आरोपांमुळे अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असं म्हणत निवडणूक आयोगाने काँग्रेसला फटकारलंय.
Election Commission: हरियाणा निवडणुकीत गडबड झाली? काँग्रेसच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर, १६०० पानी पत्रात काय म्हटलं, जाणून घ्या
Election Commission
Published On

हरियाणा निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या आरोपांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय. निवडणुकीबाबत काँग्रेसने केलेल्या आरोपांना तथ्य नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलंय. काँग्रेसचे आरोप निराधार, खोटे आणि तथ्यहीन असल्याचं म्हणत फेटाळून लावलेत. एवढेच नाही तर निवडणूकीनंतर बिनबुडाचे आरोप करणे बंद करण्यासाठी आयोगाने काँग्रेस पक्षाला पत्रही लिहिलंय.

'सामान्य' संशय पसरवल्याबद्दल निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला फटकारलं. अशी प्रवृत्ती रोखण्यासाठी काँग्रेसने ठोस आणि ठोस पावले उचलावीत, असे आवाहन आयोगाने केलंय. मतदान आणि मतमोजणी अशा संवेदनशील दिवशी बेजबाबदारासारखे आरोप केल्याने सार्वजनिक अशांती, अराजकता निर्माण करून शकते असंदेखील निवडणूक आयोगाने केलीय.

गेल्या एका वर्षातील पाच विशिष्ट प्रकरणांचा हवाला देऊन, निवडणूक आयोगाने प्रदीर्घ अनुभव असलेल्या राष्ट्रीय पक्षाला योग्य परिश्रम घेण्यास सांगितले. कोणत्याही पुराव्याशिवाय निवडणूक आचारसंहितेवर हल्ला करणे टाळले,पाहिजे असं निवडणूक आयोगाने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com