CM Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: लोकसभेला फटका, विधानसभेला सावध पवित्रा! शिंदे गटाचा उत्तर भारतीयांवर डोळा; मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवा प्लॅन

Maharashtra Assembly Election 2024: उत्तर भारतात यादव, विश्वकर्मा समाज विरोधात गेल्यामुळे भाजपाला जो फटका बसला, तोच संदेश उत्तर भारतातून महाराष्ट्रात दिला गेला होता त्याचा परिणाम महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत झाला. त्यामुळे लोकसभेतील चूक सुधारण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली आहे.

विकास काटे, ठाणे

मुंबई, ता. १९ सप्टेंबर

Shivsena Shinde Group Target North Indian voters: विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाने मुंबईमधील उत्तर भारतीय मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून लोकसभा नि वडणुकीत जे उत्तर प्रदेशात झाले ते विसरुन जावा, तिच चूक आता पुन्हा करु नका, असे म्हणत भावनिक साद घातली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रासह उत्तर- प्रदेशात मतदारांनी जोर का झटका दिला. भाजपची महत्वाची वोट बँक असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली. उत्तर भारतात यादव, विश्वकर्मा समाज विरोधात गेल्यामुळे भाजपाला जो फटका बसला, तोच संदेश उत्तर भारतातून महाराष्ट्रात दिला गेला होता त्याचा परिणाम महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत झाला. त्यामुळे लोकसभेतील चूक सुधारण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली आहे.

विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय आपल्या विरोधात जावू नये याकरता शिवसेना शिंदे गटाने उत्तर भारतीयांची मने वळवण्याकरता मोहिम हाती घेतली असून खासदार नरेश म्हस्के यांनी उत्तर भारतीय समाज कार्यक्रमात उत्तर भारतीय समाजाला भावनिक साद घालत विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत जे उत्तर प्रदेशात झाले ते विसरुन जावा, तीच चुक आता पुन्हा करु नका, उत्तर भारत आणि महाराष्ट्रात फरक आहे. इथे आमचे सरकार आहे तुम्हाला न्याय मिळणार आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणले.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीत उत्तर भारतात भाजपाला जोरदार फटका बसला होता. ⁠यादव आणि विश्वकर्मा समाज वादामुळे उत्तर भारतात भाजपाची लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाली होती. ⁠ते महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत, विशेषतः मुंबईमध्ये होवू नये याकरता खासदार नरेश म्हस्के यांनी उत्तर भारतीयांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT