Rohit Pawar on Bjp and Ajit Pawar Group Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Election : भाजप - अजित पवार गटाचे अनेक नेते संपर्कात, रोहित पवार यांच्या दाव्याने वाढलं महायुतीचं टेन्शन?

Rohit Pawar on Bjp and Ajit Pawar Group: आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, ज्याने भाजप आणि अजित पवार गटाचे टेन्शन वाढले आहे.

Satish Kengar

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

भाजप आणि अजित पवार गटाचे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने महायुतीचं टेन्शन वाढू शकतं. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार असं म्हणाले आहेत.

काय म्हणाले रोहित पवार?

पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले आहेत की, ''अनेकजण आमच्या संपृक्त आहेत. मात्र निष्ठावंत यांना विसरून चालणार नाही. त्यांना पाठिंबा देऊ. महाराष्ट्र धर्म सोडून दिल्लीकरांची चाकरी ज्यांनी केली, त्यांना घेतलं जाणार नाही. रणनीती विषय असतात काही आकडा सागितले जातील. भाजप आणि दादा यांचे अनेक लोक संपर्कात आहेत.''

शरद पवार गट किती जागांवर निवडणूक लढवणार?

यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचाराकला की, शरद पवार यांची राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवणार? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, ''पवारसाहेब यांचं जेवढं वय आहे, तेवढे आमदार निवडून यावे, अशी आमची इच्छा आहे. आपल्या जागा जास्त निवडून याव्यात असं कार्यकर्त्यांना वाटतं. 85 जागा निवडून याव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू.''

लाडकी बहीण योजेनबद्दल बोलताना ते म्हणाले की, ''आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, सतेत्त येण्यासाठी आम्ही जुगाड केला, असं काहीजण म्हणत होते. या आम्ही चांगला बदल घडून आणू. गुजरातचा विषय सोडून महाराष्ट्र विषयी विचार करू.''

महाविकस आघाडीचं सरकार आलं, तर तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असताना, रोहित पवार म्हणाले की, ''कोण मुख्यमंत्री, कोण मंत्री विचार करण्यापेक्षा महायुती सरकार हद्दपार करायचं आहे. पदाचा विचार करण्यापेक्षा महायुतीला हद्दपार करण्याचा विचार केला पाहिजे, मुख्यमंत्रीपदासाठी कष्ट करावे लागतील, प्रेमापोटी कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले असतील.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना हमीभाव द्या; खासदार बळवंत वानखडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maharashtra Live News Update : राज ठाकरेंचा १९ ऑक्टोबर रोजी मेळावा

Diwali Shopping In Thane: ठाण्यातील या 5 ठिकाणी करा दिवाळी शॉपिंग, स्वस्तात मस्त होईल खरेदी

Sambhajinagar Crime : क्षुल्लक कारणातून तरुणाची हत्या; पाच जणांना घेतले ताब्यात

Kolhapur: कोल्हापुरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT