Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ, 36 पैकी 33 जागांवर तिढा सुटला? पहिली यादी कधी होणार जाहीर? वाचा...

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीचा मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाचा याबद्दल सविस्तर माहिती...

Satish Kengar

रुपाली बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक जाहीर होताच सगळ्याच राजकीय आघाड्यांच्या जागावाटपाच्या चर्चांना गती आली आहे. यातच महाविकास आघाडीची मुंबईतील जागांसंदर्भात हॉटेल सोफिटल येथे बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील 90 टक्के जागांवर मविआची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार?

मुंबईच्या 36 विधानसभा जागांवर महाविकास आघाडीत गेल्या अनेक दिवसांपासून तिढा होता. मात्र हा तिढा आता सुटला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी सांगितलं की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मुंबईतील जागांमध्ये शिवसेना ठाकरे गटच मोठा पक्ष असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला मुंबईत अधिक जागा महाविकास आघाडीमध्ये येणार आहे.

पहिली यादी कधी होणार जाहीर?

आज झालेल्या मुंबईच्या जागावाटपाच्या बैठकीत 36 पैकी 33 जागांवर महाविकास आघाडीतील नेत्यांचा एक मत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच येत्या दोन- तीन दिवसात जागावाटप आणि काँग्रेसची पहिली उमेदवारांची यादी जाहीर होणार, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत कोणाचे किती आमदार?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील 36 जागांवर सर्वाधिक संख्या भाजप आमदारांची आहे. मुंबईत भाजपचे 16 आमदार आहेत. तर शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचे गटाकडे 8 आमदार आहेत, तर शिंदे गटाकडे 6 आमदार आहेत. तसेच काँग्रेसचे 4 आमदार असून अजित पवार गटाचा 1 आणि समाजवादी पक्षाचा 1 आमदार मुंबईत आहेत.

दरम्यान, काँग्रेसची याआधी कधी जाहीर होणार याचे उत्तर स्वतः विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''२० तारखेला केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. त्यावेळी संध्याकाळी यादी येणे अपेक्षित आहे. मोठा भाऊ लहान भाऊमध्ये आम्हाला अडकवू नका. दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल.'', असं ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

SCROLL FOR NEXT