Maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मित्र-शत्रू-मित्र, 5 वर्षांचं चित्र; महाराष्ट्रातल्या राजकारणाची 10 धक्कादायक वळणं, पाहा व्हिडिओ

Maharashtra assembly Election : राज्य पुन्हा विधानसभा निवडणुकांना सामोरं जात असताना गेल्या 5 वर्षात राज्यात काय काय घडलं यासाठी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल..राज्यात गेल्या पाच वर्षात काय घडलं याची उजळणी करणारा हा रिपोर्ट...

Tanmay Tillu

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षामध्ये प्रचंड घडामोडी घडल्या आहेत. शत्रू मित्र झाले आणि मित्र शत्रू झाले. अनेक पक्ष फुटले, घरं फुटली, आघाड्या तयार झाल्या. 5 वर्षानंतर महाराष्ट्र पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. या 5 वर्षामध्ये काय काय घडामोडी घडल्या? त्याबद्दल जाणून घेवूयात.

राज्यातील राजकारणाची 10 धक्कादायक वळणं-

पहिलं वळण -

मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेना युती तुटली

दुसरं वळण -

शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादीकडून मविआची स्थापना

शरद पवारांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त ठाकरे कुटुंबाने 'सिल्व्हर ओक'वर जाऊन शुभेच्छा दिल्या

तिसरं वळण -

फडणवीस-अजित पवार सरकार आलं गेलं

चौथं वळण -

मविआ सरकार सत्तेवर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री

पाचवं वळण -

शिवसेना पक्षात फूट, एकनाथ शिंदेंचं बंड

सहावं वळण -

मविआ सरकार अल्पमतात; ठाकरेंचा राजीनामा

सातवं वळण -

शिंदे सरकार सत्तेवर; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

आठवं वळण -

धनुष्यबाणासह शिवसेना शिंदेंची झाली

नववं वळण -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट, अजित पवारांचं बंड

दहावं वळण -

अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री

प्रतीक्षा संपणार ! -

कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? 23 नोव्हेंबरला होणार स्पष्ट

यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्येही चुरस रंगणार आहे. राज्यात प्रथमच दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी रिंगणात असणार आहे. त्यामुळे मतदारांचा कौल कोणत्या पक्षाला मिळणार हेच पाहायचं. महाविकास आघाडी की महायुती बाजी मारणार यासाठी 23 नोव्हेंबरची वाट पहावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf : अशोक मामांना कलाविश्वातील मोठा पुरस्कार जाहीर, शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

Lado Laxmi Yojana: नोव्हेंबरपासून महिलांच्या खात्यात ₹२१०० येणार, राज्य सरकारची घोषणा

Chhagan Bhujbal : बेनामी मालमत्ता प्रकरण, छगन भुजबळ अडचणीत? | VIDEO

Google Gemini Ai फोटो डाऊनलोड कसा करायचा? सोपी पद्धत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT