Congress Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 'एक पाऊल पुढे', बड्या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी, वाचा

Vishal Gangurde

सुनील काळे, साम टीव्ही

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या आगामी विधानसभा निवडणुकीमुळे सर्व राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. या सर्व राजकीय पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकलं आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी मोठी तयारी केल्याचं दिसत आहे. काँग्रेस १ ऑक्टोबरपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करणार आहे. यासाठी काँग्रेसने बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केल्याची माहिती हाती आली आहे. काँग्रेस १ ऑक्टोबरपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करणार आहे. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी काँग्रेसने नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. १ ते ८ ऑक्टोबरपर्यंत नेते जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेणार आहे. तर काँग्रेसचे बडे नेते त्यांचा अहवाल हा प्रदेश काँग्रेसला देणार आहे. काँग्रेस पक्षाकडे आतापर्यंत एकूण १६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे

काँग्रेसने कोणावर सोपवली जबाबदारी?

काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्राकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, माजी मंत्री सतेज पाटील, अमित देशमुख, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, वसंत पुरके, नाना गावंडे या नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.

आगामी विधानसभेच्या तयारीसाठी शिंदे गटाकडून तयारीला वेग

शिंदे गटाच्या वतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. नंदूरबारमधील अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघावर शिंदे गट उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. यासाठी धडगाव शहरात शिवसेना शिवदूत आणि बुथप्रमुखांचं संमेलन घेण्यात आलं. या संमेलनात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असून पक्षांना कोणताही उमेदवार दिला तरी त्याला निवडून देण्याचा निर्धार यावेळीस करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पार्टी आता शरद पवार गटात विलीन होणार?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : विधानसभेत काकांचा दादांना धोबीपछाड? अजित पवारांचे निकटवर्तीय शरद पवार गटाच्या गळाला? पाहा व्हिडिओ

Viral Video: गेंडा पिसाळला; पाठलाग करत दुचाकीस्वाराला चिरडलं; शेतात सापडलं बाईककरचं डोकं, Live Video

Pune Crime : पुण्यासह देशभरात CBIची धडक कारवाई; ₹ ५८००००० रोकड जप्त, नेमकं कारण काय?

Badlapur : धबधब्याच्या मागे दडलीये रहस्यमयी गुहा

SCROLL FOR NEXT