MAHARASHTRA SET EXAM POSTPONED: 41ST SET TEST RESCHEDULED TO SEPTEMBER 6 AMID MPSC EXAMS AND ASHADHI WARI Saam Tv
मुंबई/पुणे

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Maharashtra SET Exam Update News : राज्यातील ४१ वी SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २६ जुलैऐवजी आता ही परीक्षा ६ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

Alisha Khedekar

  • ४१ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) पुढे ढकलली

  • २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबर रोजी होणार परीक्षा

  • एमपीएससी परीक्षा आणि आषाढी वारीमुळे विद्यार्थ्यांनी केली होती मागणी

सचिन जाधव, पुणे

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC ) परीक्षा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली ४१ वी सेट परीक्षा आता ६ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यापीठे तसेच वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित करणारी सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित केली जाते. विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा राज्य सरकारची नोडल एजन्सी म्हणून कार्यरत असून UGC मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही परीक्षा घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. यंदाची ४१ वी सेट परीक्षा २६ जुलै रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध विषयांच्या भरतीसाठीच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांपैकी एकाच परीक्षेला उपस्थित राहता येणार होते.

या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. याशिवाय, ७ जुलै ते २५ जुलै या कालावधीत आषाढी वारी असल्याने राज्यातील अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता होती. वारीमुळे रस्ते वाहतूक, सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि परीक्षार्थ्यांच्या प्रवासावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे परीक्षा केंद्रांपर्यंत वेळेत पोहोचण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे एमपीएससी आणि सेट या दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला, तरी सेट परीक्षेची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आता ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ मिळणार असून तयारी अधिक भक्कम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

SCROLL FOR NEXT